शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या अपघातात एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:36 IST

कोपरगाव : रस्ता ओलांडताना मागून भरधाव येणाऱ्या मालट्रकने वृद्धाला जोराची धडक दिली. त्यानंतर ट्र्कच्या चाकाखाली चिरडले. ही मंगळवारी ( ...

कोपरगाव : रस्ता ओलांडताना मागून भरधाव येणाऱ्या मालट्रकने वृद्धाला जोराची धडक दिली. त्यानंतर ट्र्कच्या चाकाखाली चिरडले. ही मंगळवारी ( दि.२ मार्च ) सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील नगर - मनमाड महामार्गावरील अपना बाजारसमोर घडली आहे. निवृत्ती तुळशीराम कहांडळ (वय ६८, रा. काहंडळवाडी वावी, ता. सिन्नर जि. नाशिक ) असे या घटनेतील जखमी व्यक्तीचे नाव आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील अपना बाजार येथे जखमी निवृत्ती हे आपल्या कामानिमित्त आले होते. काम झाल्यानंतर नगर - मनमाड रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूस चहा घेण्यासाठी जात होते. तितक्यात शिर्डीच्या दिशेने भरधाव चाललेल्या मालट्रकने (टी. एन. ५२, एफ. ९२५९ ) काहंडळ यांना जोराची धडक दिली. ते खाली पडले व त्यांच्या दोन्ही पायावरून ट्रकचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी हजर झाले होते.

दरम्यान घटनास्थळी असलेल्या अपना बाजार येथील युवक मोसीन सय्यद, मक्का तांबोली, मुन्ना शेख तसेच रुग्णवाहिका चालक अमित खोकले व इतरांनी मदत करून जखमी आजोबांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस कॉन्स्टेबल राम खरतोडे, संभाजी शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.