नेवासा : नेवासा-नेेवासा फाटा रस्त्यावर पावन गणपतीसमोर असलेल्या साक्षी ब्युटी पार्लर दुकान फोडून चोरट्यांनी साड्या, ज्वेलरी साहित्य, रोकड असा १ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत अश्विनी अमोल पागिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा-नेवासा फाटा रस्त्यावर पावन गणपती समोर असलेल्या अश्विनी पागिरे यांच्या साक्षी ब्युटी पार्लरचा कडी-कोयंडा उचकाटून चोरट्यांनी वेगवेगळ्या दराच्या २४ हजारांचा १३३ साड्या, ९४ लेडिज टॉप, १३ हजार रुपयांचे साहित्य, कपडे, ६७ हजारांच्या १ ग्रॅम ज्वेलरीचे १२ नग, बांगड्या, साडेतीन हजारांची रोकड, असे एकूण १ लाख १० हजार १३१ रुपये किमतीचे साहित्य लंपास केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुळशीराम गिते करीत आहेत.