शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविणार -नरेंद्र पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:54 IST

राज्यातील एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नगर येथे केले.

अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना सोबत घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असून, राज्यातील एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नगर येथे केले.पुणे महामार्गावरील मंगल कार्यालयात आयोजित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक व्हा, या कार्यक्रमात पाटील बोलत होते. आमदार संग्राम जगताप, माजी महापौर शीला शिंदे, उद्योजक चंद्रकांत गाडे, नगरसेवक गणेश भोसले, विनीत पाअुलबुधे, माजी नगरसेवक  बाळासाहेब पवार, निखील वारे, माजी सभापती सचिन जाधव आदींची प्रमुख उपस्थित होती. नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, राजकीय जोडे बाजूला ठेवून अण्णासाहेब विकास महामंडळाची वाटचाल सुरू आहे. योजनेसाठी कुठल्याही राजकीय नेत्यांची शिफारस लागत नाही. कर्जाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन आहे. महामंडळाच्या योजनांची माहिती आणि येणा-या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा व तालुकानिहाय दौरे सुरू करण्यात आले आहे. दौºयांची सुरुवात जालना जिल्ह्यातून करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्यावेळी अनेकांनी समन्वयक म्हणून सक्षमपणे जबाबदारी पार पडली. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची जिल्हानिहाय बैठका घेण्यात येतील. या बैठकांमध्ये योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाºया अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरी भागात योजनांचा लाभ मिळेलच. परंतु, ग्रामीण भागातील युवकांना दिशा मिळत नाही. त्यांना दिशा देण्याचे काम महामंडळांच्या माध्यमातून केले जाणार असून, ही योजना शेतकºयांच्या बांधावर पोहोचविण्याचा मानस आहे, असे पाटील म्हणाले.सरकार घरी आणून रोजगार देणार नाही. उद्योजक बनण्यासाठी स्वत:च प्रयत्न करावे लागतील. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.राज्यातील १० हजार समाज बांधव महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. आणखी ९० हजार उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम केलेल्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकार समाजाच्या मागे खंबीरपणे उभे आहे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbusinessव्यवसाय