शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

लोणी येथे गोळीबारात एकाचा मृत्यू; आर्थिक देवाणघेवाणीतून घडली घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:59 IST

दोन गटात शाब्दिक चकमकीतून वादावादी झाली. यानंतर एकाने केलेल्या गोळीबारात एका जणाचा मृत्यू झाला.

लोणी :  दोन गटात शाब्दिक चकमकीतून वादावादी झाली. यानंतर एकाने केलेल्या गोळीबारात एका जणाचा मृत्यू झाला. ही घटना लोणी (ता.राहाता) येथील हसनापूर रस्त्यावर साई छत्रपती या हॉटेलच्या आवारात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास  घडली.फरदिन उर्फ भैय्या आबु कुरेशी (रा.श्रीरामपूर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, उमेश नागरे, अक्षय बनसोडे, सुभाष कदम, अरुण चौधरी (चौघे रा.लोणी) तर संतोष सुरेश कांबळे, सिराफ उर्फ आयुब शेख, शहारूख शहा पठाण, फरदिन उर्फ भैय्या आबू कुरेशी (तिघेही रा.श्रीरामपूर) हे सात जण दारू पिण्यासाठी व जेवणासाठी साई छत्रपती या हॉटेलमध्ये आले होते. यावेळी त्यांची हॉटेलच्या आवारातच आपसाआपसात शाब्दिक बाचाबाची झाली. या शाब्दिक बाचाबाचीतूनच या सात पैकी एकाने फरदिन उर्फ भैय्या आबू कुरेशी याच्यावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे कुरेशी हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर इतर सर्व जण फरार झाले होते. मात्र  सोमवारी सकाळपर्यंत सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आर्थिक देवाण घेवाणीतून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक एन. बी. सूर्यवंशी करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी