शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अबब! एका महिन्यात दीड कोटी क्विंटल साखर तयार; साखरेच्या उता-यात नगर पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 19:30 IST

सन २०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन १ महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात साखर आयुक्तांलयांतर्गत कोल्हापूर विभागाने सरासरी १०.३४ टक्के साखर उतारा मिळवित आपली आघाडी कायम राखली आहे. पहिल्या पंधरवड्यात तिस-या क्रमांकांवर असलेल्या अहमदनगर विभागाची चौथ्या क्रमांकांवर घसरगुंडी झाली आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : सन २०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन १ महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात साखर आयुक्तांलयांतर्गत कोल्हापूर विभागाने सरासरी १०.३४ टक्के साखर उतारा मिळवित आपली आघाडी कायम राखली आहे. पहिल्या पंधरवड्यात तिस-या क्रमांकांवर असलेल्या अहमदनगर विभागाची चौथ्या क्रमांकांवर घसरगुंडी झाली आहे. साखर उता-यावरूनच उसाचा भाव ठरत असल्याने या उता-याला ऊसउत्पादकांच्या दृष्टीने महत्त्व आहे.१ नोव्हेंबरला यंदाचा साखर हंगाम सुरू झाला. १ डिसेंबरअखेर राज्यात ९४ सहकारी व ७७ खासगी अशा १७१ साखर कारखान्यांमधून उसाचे गाळप सुरू झाले आहे. महिनाभरात राज्यात १ कोटी ६६ लाख ५५ हजार मेट्रिक टन ऊस गाळपातून १ कोटी ५४ लाख ९९ हजार क्विंटल साखर तयार झाली आहे.पुणे विभागात सर्वाधिक ५८ कारखाने सुरू झाले आहेत. कोल्हापूरमध्ये ३७, नांदेडमध्ये २८, तर अहमदनगरमध्ये २३ कारखाने सुरू आहेत. राहुरीच्या तनपुरे कारखान्याचा बॉयलर पेटला असला, तरी त्याचे गाळप अजून सुरू झालेले नाही. अहमदनगर जिल्ह्यात साईकृपा-१ हा १०.३२ टक्के उता-यासह पहिल्या क्रमांकावर, अंबालिका (इंडेकॉन) हा खासगी कारखाना ९.९१ टक्के उता-यासह दुस-या क्रमांकांवर आहे. श्रीगोंदा कारखाना ९.८३ टक्के उता-यासह तिस-या, प्रवरानगरचा पद्मश्री विखे कारखाना व कुकडी कारखाना ९.३७ टक्के उता-यासह चौथ्या, तर संगमनेरचा थोरात कारखाना ९.२५ टक्के उता-यासह जिल्ह्यात पाचव्या क्रमांकांवर आहे.

राज्यातील विभागनिहाय साखर उतारा

कोल्हापूर १०.३४ टक्के, पुणे ९.५५, अमरावती ८.९५, अहमदनगर ८.८५, नांदेड ८.४८,औरंगाबाद ७.५६, नागपूर ६.१६.

विभागनिहाय गाळप व साखर उत्पादन

कोल्हापूर ३८.५५ लाख मे. टन ऊस गाळपातून ३९.८५ लाख क्विंटल साखर उत्पादन, पुणे ६६.१० मे. टन गाळप, ६३.११ लाख क्विंटल साखर उत्पादन, अहमदनगर २४.५६ लाख मे. टन गाळप, २१.७४ लाख क्विंटल साखर उत्पादन, औरंगाबाद १४.१९ लाख मे. टन गाळप, १०.७३ लाख क्विंटल साखर उत्पादन, नांदेड २१.१२ लाख मे. टन गाळप, १७.९१ लाख क्विंटल साखर उत्पादन, अमरावती १.४४ लाख मे. टन गाळप, १.२९ लाख क्विंटल साखर उत्पादन, नागपूर ०.५९ लाख मे. टन ऊस गाळपातून ०.३७ लाख क्विंटल साखर उत्पादन.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने