कर्जत : तालुक्यातील पाटेगाव येथील दोन मुलींवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींपैकी एकास बुधवारी कर्जत पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील चाकण येथे अटक केली. पाटेगाव येथील दोन मुलींना फसवून त्यांची छायाचित्रे काढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून बदनामीची धमकी दिल्याच्या आरोपावरून कर्जत पोलिसात राहुल गोविंद लाड व तुषार बबन लाड या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून दोन्ही आरोपी फरार होते. राहुल गोविंद लाड यांच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता तो चाकण (ता. हवेली, जि. पुणे) येथे गणपती मंदिरात सापडला. दुसरा आरोपीही लवकरच सापडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पाटेगाव अत्याचारप्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:37 IST