शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रणरणत्या उन्हात वृध्द, निराधार रस्त्यावर

By admin | Updated: October 20, 2016 01:32 IST

शेवगाव : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. पक्षाचे जिल्हा सचिव अ‍ॅड. सुभाष लांडे,

शेवगाव : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.पक्षाचे जिल्हा सचिव अ‍ॅड. सुभाष लांडे, ज्येष्ठ नेते कृष्णनाथ पवार, शशीकांत कुलकर्णी, संजय नांगरे, राम पोटफोडे, बापूराव राशीनकर, अशोक नजन, कारभारी वीर, आत्माराम देवढे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. निवासी नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांनी निवेदन स्वीकारले. संजय गांधी योजना विभागाचे संबंधित मात्र मोर्चाला सामोरे आले नाहीत.या आंदोलनात योजनेच्या लाभापासून वंचित असलेले वृद्ध निराधार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुक्यात गेल्यावर्षी संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचे १५ हजारांपर्यंत लाभधारक होते. सध्या योजनेची तालुका समिती अस्तित्वात नसल्याने तहसील कार्यालयातील अधिकारी योजनेचे काम पाहत आहेत. तालुक्यातील अनेक लाभधारकांना योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. नवीन प्रस्ताव दाखल केल्यास अनेक चकरा माराव्या लागतात.प्रस्ताव मंजुरीच्या चौकशीसाठी गेल्यास कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या बैठकीत २ हजारपैकी २०० ते २५० प्रस्ताव मंजूर झाले. इतर प्रस्ताव अपुऱ्या कागदपत्रांमुळे पेंडिंग ठेवण्यात आले. संबंधितांना पत्राद्वारे अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता कळविण्याचे सौजन्य संबंधितांनी दाखविले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचा गरजूंना लाभ मिळावा, पेन्शन योजनेचा कायदा करावा, बंद प्रकरणे पुन्हा सुरु करावीत, नवीन प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, सर्व वृद्ध, विकलांग व परित्यक्त्यांना दरमहा किमान १ हजार रुपये पेन्शन मिळावी, नवीन प्रस्ताव दाखल करणाऱ्यांना तलाठ्याकडून २१ हजार रुपये उत्पन्नाचा दाखला मिळावा.