शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन वृध्देची आत्महत्या

By admin | Updated: October 30, 2023 18:18 IST

जामखेड : भाजलेल्या विवाहितेचे बरेवाईट झाल्यास जबाबात नाव घालू असा दम दिल्याने घाबरुन वृध्देने गळफास घेऊन आत्महत्या केली.

जामखेड : भाजलेल्या विवाहितेचे बरेवाईट झाल्यास जबाबात नाव घालू असा दम दिल्याने घाबरुन वृध्देने गळफास घेऊन आत्महत्या केली. वृध्देच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन जामखेड पोलिसांनी तिघाजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील भुतवडा येथे ही घटना घडली. शहाबाई लक्ष्मण डोके (वय ६५, रा. भुतवडा) हे आत्महत्या केलेल्या वृध्देचे नाव आहे. याबाबत हरिभाऊ लक्ष्मण डोके रा. भुतवडा ता. जामखेड यांनी फिर्याद दिली. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, माझी भावजय मीना बाबासाहेब डोके हिने मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास रॉकेल ओतून पेटवून घेतले. तिच्यावर सध्या नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घटनेनंतर मीना डोके हिचा भाऊ सीताराम नवनाथ भवर, वडील नवनाथ भवर, आई संजना नवनाथ भवर (सर्व रा. देसूर, ता. आष्टी, जि. बीड) हे आमच्या घरी आले. व आमची मुलगी मीना हिचे बरेवाईट झाल्यास तुमची आई शहाबाई यांचे नाव जबाबात घालू, असा दम दिला. या दमाला घाबरुन शहाबाई हिने घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे हरिभाऊ डोके यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन जामखेड पोलिसांनी वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. (तालुका प्रतिनिधी)