शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राजळे यांच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन

By admin | Updated: June 7, 2017 16:02 IST

आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयासमोर सामूहिक जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

आॅनलाईन लोकमतशेवगाव, दि़७ - शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी बुधवारी शेवगाव तालुक्यातील भाकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे, किसान सभा आदी संघटनांच्यावतीने आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयासमोर सामूहिक जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ८ जून रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत जाहीर होणाऱ्या पुढील आंदोलनाच्या दिशेनुसार आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार या वेळी जाहीर करण्यात आला. शहरातील गाडगेबाबा चौकापासून घोषणा देत निघालेला हा मोर्चा आमदार राजळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांनी अडविल्यानंतर या ठिकाणी शासन व लोकप्रतिनिधींना जाग यावी, यासाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे, कॉ. शशिकांत कुलकर्णी , कॉ. संजय नांगरे, कॉ. भगवान गायकवाड, आत्माराम देवढे, बापूराव राशिनकर, राम पोटफोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेवगाव शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे , सतिश मगर, बाळा वाघ, अशोक नजन, अविनाश देशमुख, नारायण पुंड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.