शिंगवे येथील माउली सेवा प्रतिष्ठानच्या मनगाव प्रकल्पात ग्लोबल नगरी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डियाक ॲम्ब्युलन्सच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. ग्लोबल नगरी फाउंडेशन ही जगात विविध देशांत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील नगरकरांनी मिळून स्थापन केलेली संस्था आहे. कोरोनाच्या काळात नगरकरांसाठी काहीतरी करावे, अशी सर्व ग्लोबल नगरी परिवाराची इच्छा होती. त्यातून ग्लोबल नगरी फाउंडेशनने डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांच्या माउली सेवा प्रतिष्ठानची निवड केली. ग्लोबल नगरी परिवाराने माउलीवर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. राजेंद्र धामणे यांनी सांगितले. ग्लोबल नगरीच्या सोबत नगरकरांसाठी व माउलीच्या मानसिक आरोग्यविषयक उपक्रमामध्ये सहभागी होऊन विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यास फिरोदिया ग्रुप कटिबद्ध असेल, असे उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले. माउलीच्या मायमाउली ज्येष्ठ लेखिका व अनिवासी भारतीय निलू गवाणकर यांनी या उपक्रमास शुभेच्छा देऊन ग्लोबल नगरी आणि माउलीने एकत्रितपणे आरोग्यसेवेसाठी काम करावे, असे आवाहन केले. यावेळी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वसंत कटारिया, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर लांडगे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सदस्य अप्पासाहेब शिंदे, उद्योगपती दीपक दरे, ज्येष्ठ नाट्यकर्मी व माउलीचे भूदाते आबाजी, मेघमला पठारे, पंचायत समितीचे सदस्य व्ही. डी. काळे, प्रा. सुरेशराव काळे उपस्थित होते. ग्लोबल नगरी परिवाराचे विविध देशांतील सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ग्लोबल नगरीचे अध्यक्ष किशोर गोरे यांनी ग्लोबल नगरीची भूमिका विशद केली. सचिव रोहित काळे व सदस्य लता शिंदे यांनी उपक्रमाची माहिती दिली. प्रास्ताविक मोनिका साळवी यांनी केले. डॉ. किरण धामणे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नीलम लोखंडे, अशोक तानूरकर, डॉ. सुचेता धामणे यांनी परिश्रम घेतले.
----------
फोटो - १३ग्लोबर नगरी
शिंगवे येथील माउली सेवा प्रतिष्ठानच्या मनगाव प्रकल्पास ग्लोबल नगरी फाउंडेशनच्या वतीने कार्डियाक ॲम्ब्युलन्स देण्यात आली.