अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा आता बरे झालेल्या रुग्णांचीच संख्या वाढली असून, जिल्ह्यातही हे चित्र दिलासादायक ठरले आहे. जिल्ह्यात गुरुवारी २,९३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ३,१३० जणांना घरी सोडले आहे. सध्या बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८५.७२ टक्के इतके आहे. सध्या २२ हजार ४६४ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७९४, खाजगी प्रयोगशाळांत केलेल्या तपासणीत १,२४२ आणि अँटिजन चाचणीत ८९९ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ३९, जामखेड ११८, कर्जत ५८, कोपरगाव ६१, नगर ग्रामीण ५१, नेवासा ३२, पारनेर २४, पाथर्डी ७०, राहता ९२, राहुरी २४, संगमनेर २, शेवगाव ९८, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर ३५, कँटोन्मेंट बोर्ड ५०, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा ६, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ४५८, अकोले ३, जामखेड ९, कर्जत १६, कोपरगाव ७, नगर ग्रामीण १७८, नेवासा २७, पारनेर २४, पाथर्डी ३०, राहाता ७४, राहुरी ४५, संगमनेर २०५, शेवगाव १२, श्रीगोंदा ४८, श्रीरामपूर ६२, कँटोन्मेंट बोर्ड १७ आणि इतर जिल्हा २७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत आज ८९९ जण बाधित आढळून आले. नगर शहर १६०, अकोले ८, जामखेड २६, कर्जत ४, कोपरगाव ४३, नगर ग्रामीण ७८, नेवासा ४१, पारनेर ५५, पाथर्डी ५, राहाता ९४, राहुरी १२९, संगमनेर ४०, शेवगाव १८ श्रीगोंदा १६८, श्रीरामपूर १३, कँटोन्मेंट ८ आणि इतर जिल्हा ९, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर ४६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
-----------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : १,४६,६५८
उपचार सुरू असलेले रुग्ण : २२,४६४
मृत्यू : १,९६५
एकूण रुग्णसंख्या : १,७१,०८७