शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाचशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 12:29 IST

अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्याुमळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता पाचशे झाली आहे. ३५ पैकी नगर शहरात २१ रुग्ण आढळून आले असून पाईपलाईन रोडवरील पद्मानगर परिसर लॉक करण्यात आला आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्याुमळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता पाचशे झाली आहे. ३५ पैकी नगर शहरात २१ रुग्ण आढळून आले असून पाईपलाईन रोडवरील पद्मानगर परिसर लॉक करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी १०, तर दुपारी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात नगर शहरात २१, अकोले-२, कोपरगाव-१, राहुरी-४, श्रीरामपूर-१, संगमनेर-१, पाथर्डी-१, राहाता-१ असे रुग्ण आढळून आले. अन्य एक बीड जिल्ह्यातील आहे.

नगर शहरातील तोफखाना भागात १०, ढवणवस्ती भागात २, केडगाव परिसरात ०१ आणि भूषणनगरमध्ये  ०१ रुग्ण आढळून आला आहे. सिद्धार्थ नगर येथील ३० वर्षीय पुरुष, सुडकेमळा येथील ५० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे. पाईपलाईन रोडवरील पदमानगरमध्ये ५७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, ११ वर्षाचा मुलगा आणि ३० वर्षाचा युवक असे पाच जण बाधित आढळून आले आहेत. पद्मानगर येथील सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत.राहुरी तालुक्यातील केसापूर येथे ०३, वांबोरी येथे ०१ रुग्ण आढळला आहे. शिरुरकासार (जि. बीड) येथील एक व्यक्ती बाधित आढळला आहे. पाथर्डीमधील वामनभाऊनगर येथे एक बाधित रुग्ण, कोपरगाव येथील श्रीकृष्णनगर येथील ०१ आणि ओमनगर येथील ०२, शिर्डी (ता. राहाता) येथील ०१, आणि खैरे निमगाव (ता. श्रीरामपूर) येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटीव आढळून आला आहे.अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील २६ वर्षीय युवक आणि १७ वर्षीय युवती बाधित आढळून आली आहे. हे दोघे रुग्ण मुंबईहून प्रवास करून आले होते.संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ३५ वर्षीय युवक बाधित आढळून आला आहे. हा रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.-----------चालकाचा मृत्यूअकोले तालुक्यात बुधवारी कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू झाला आहे. कृषी उत्त्पन्न बाजार समितीजवळ राहणारा शहरातील नामवंत दुकानदाराच्या गाडीवर तो चालक होता. रविवारी पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या चालकाची मंगळवारी प्रकृती खालावली व त्याचा मृत्यू झाला. या युवकाची पत्नी, मुलगा व इतर जवळच्या संपर्कातील दोन असे एकुण सहा व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.