शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची रुग्णसंख्या १४४० पर्यंत घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:16 IST

अहमदनगर : जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ८६३ इतकी झाली ...

अहमदनगर : जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ८६३ इतकी झाली आहे. बाधित रुग्णांची संख्या प्रथमच दीड हजाराच्या आत आली असल्याने दिलासा मिळाला असला तरी ६१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी ११४५ कोरोनामुक्तांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२४ टक्के इतके झाले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४६५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५७७ आणि अँटिजन चाचणीत ३९८ जण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर ६, अकोले ५, जामखेड ६४, कर्जत १, कोपरगाव १, नगर ग्रामीण २७, नेवासा ५१, पारनेर ४९, पाथर्डी ४८, राहता २४, राहुरी १, संगमनेर ४३, शेवगाव ११७, श्रीगोंदा ६, श्रीरामपूर २, कॅंटोन्मेंट बोर्ड ३, मिलिटरी हॉस्पिटल ५ आणि इतर जिल्हा ९ आणि इतर राज्य ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ४४, अकोले ९, जामखेड ३२, कर्जत ४९, कोपरगाव ७१, नगर ग्रामीण २४, नेवासा ९४, पारनेर २३, पाथर्डी ०८, राहाता २५, राहुरी ४९, संगमनेर २६, शेवगाव ४७, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ५२ आणि इतर जिल्हा ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत आज ३९८ जण बाधित आढळून आले. यात नगर शहर ८, अकोले ३३, जामखेड १३, कर्जत ४४, कोपरगाव २६, नगर ग्रामीण १७, नेवासा ४२, पारनेर २१, पाथर्डी ६४, राहाता १०, राहुरी १९, संगमनेर २१, शेवगाव १८, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ३३, कँटोन्मेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

--------

कोरोनास्थिती

बरे झालेले रुग्ण : २,४६,१८७

उपचार सुरू असलेले रुग्ण : ११८६३

मृत्यू : ३१७३

एकूण रुग्णसंख्या : २,६१,२२३