शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटली, कमी पाऊस पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 16:49 IST

जुनचा पहिला पंधरवाडा संपला असतांना झाडांवर पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले आहे़ वाढत्या पक्ष्यांची संख्या घटल्याचे आले आहेत़यंदा पावसाचे प्रमाणही मध्य राहील असा आंदाज अभ्यासक बापुसाहेब झडे यांनी व्यक्त केला आहे़

राहुरी : जुनचा पहिला पंधरवाडा संपला असतांना झाडांवर पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले आहे़ वाढत्या पक्ष्यांची संख्या घटल्याचे आले आहेत़यंदा पावसाचे प्रमाणही मध्य राहील असा आंदाज अभ्यासक बापुसाहेब झडे यांनी व्यक्त केला आहे़१५ मे ते १५ जुन यादरम्यान पक्षी विविध प्रकारच्या झाडांवर घरटे बांधतात़ यंदा मात्र पक्ष्यांनी कमी प्रमाणावर घरटे बांधल्याचे आढळून आले आहे़ कडुनिंब, बाभुळ, बोर, जांभुळ, आंबा, वड, पिंपळ आदी झाडांवर पक्ष्यांनी घरटे बांधले आहेत.तुरळक ठिकाणी झाडांवर पक्षी घरटे बांधत आहेत़ त्यामध्ये चिमणी, गवळणी, होला, साळुंकी आदी पक्ष्यांनी झाडांवर घरटे तयार केले आहेत़ यंदा झाडांवर दक्षिण व पश्चिम बाजुला पक्ष्यांनी घरटे बांधलेले आहेत़ झाडाच्या मध्यावर थोडेसे वरती घरटे आढळून आलेले आहेत़ त्यामुळे यंदा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पक्ष्यांनी झाडावर वरच्या बाजुला घरटे बांधल्यास कमी पावसाचा आंदाज व्यक्त होतो़ मध्यावर घरटे बांधल्यास भरपुर पाऊस पडतो़गेल्या दहा वर्षापासून त्यांचा अंदाज खरा ठरला आहे़ गेल्या वर्षी पक्ष्यांनी झाडाच्या मध्यावर घरटे बांधली होती़ त्यावेळी समाधानकारक पाऊस पडण्याचा आंदाज व्यक्त केला होता़ यंदा गेल्या गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पाऊस पडेल. बापुसाहेब झडे हे गेल्या दहा वर्षापासून पक्ष्यांची घरटे व त्यावर आधारीत पावसाचा अंदाज व्यक्त करतात़पावशा हा पक्षी पेरत व्हा असा संदेश पावसाळ््याच्या तोंडी देतो़ मोरही पावसाचे संदेश देतो़ पक्ष्यांना निसर्गाच्या लहरींची जाणीव होते़ पशु-पक्ष्यांना संकटाची चाहुल लागते़ यंदा पक्ष्यांच्या घरट्यांंची बांधणी लक्षात घेता गेल्या वर्षाच्या तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. - बापुसाहेब झडे, अभ्यासक, राहुरी 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी