शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्हा परिषदेत आता आॅनलाईन अभिप्राय

By admin | Updated: July 29, 2016 17:48 IST

अहमदनगर : सरकारी लालफितीचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी नगर जिल्हा परिषद प्रशासनाने आॅनलाईन टिपण्या (अभिप्राय) लिहिण्याच्या अनोखा प्रयोग केला आहे.

अहमदनगर : सरकारी लालफितीचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी नगर जिल्हा परिषद प्रशासनाने आॅनलाईन टिपण्या (अभिप्राय) लिहिण्याच्या अनोखा प्रयोग केला आहे. प्रत्येक कामाच्या फाईलमध्ये आॅनलाईन टिपणी लिहिणारी नगर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरणार आहे. आॅनलाईन टिपणीमुळे जिल्हा परिषद प्रशासनाचा वेळ, पैसा वाचण्यासोबत कामाची गोपनीयता वाढणार आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने अथर्व सॉफ्टेक या संस्थेकडून ‘ई फाईल प्रणाली’ तयार करून घेतली आहे. या प्रणालीत क्यू आर आणि बार कोड टाकून ही आॅनलाईन टिपणी तयार करण्यात येणार आहे. या ई फाईल प्रणालीचा वापर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाला करता येणार आहे. विशेष म्हणजे या ई फाईलमध्ये एकदा तयार झालेल्या टिपणीत पुन्हा कधीच बदल करता येणार नाही. ई फाईलमध्ये प्रत्येक पानावर बार कोड आणि क्यू आर कोड राहणार आहे. या दोन्ही पैकी कोणताही एक कोड स्कॅन केल्यावर संबंधित फाईल कोणत्या कर्मचाऱ्याच्या ताब्यात आहे. त्यावर काय कार्यवाही झाली याचा संपूर्ण तपशील समजणार आहे. देशात सध्या डिजिटल इंडियाचे वारे वाहत असून सरकारी कार्यालयात ई आॅफिस राबवण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून आता आॅनलाईन टिपणी देण्याचा प्रयोग जिल्हा परिषद राबविणार आहे. गुरूवारी सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना या आॅनलाईन टिपणीचे प्रशिक्षण दिले आहे. पहिल्या १५ दिवसात हा प्रयोग केवळ सामान्य प्रशासन विभागात राबवण्यात येणार असून त्यानंतर अन्य विभागात ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)ई आॅफिसच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात सामान्य प्रशासन विभागात ई टिपणी लिहिण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत सेंटर सर्व्हर यंत्रणा कार्यान्वित केल्यावर पूर्ण क्षमतेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ई टिपणी सिस्टीममुळे अधिकारी बदलल्यावर फाईलमधील टिपणी बदलता येणार नाही. -रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. अहमदनगर.