श्रीगोंदा : श्रीगोंद्यातील ३७२ प्राथमिक शाळांमध्ये चिमुकल्यांच्या हाती गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले़ नेते, शिक्षणप्रेमी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले़ या शैक्षणिक वर्षापासून सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी एबीसीडी पासून चिमुकल्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला.श्रीगोंदा येथील मुलींच्या शाळेत आ. बबनराव पाचपुते, गोपाळराव मोटे, सतिश मखरे यांच्या हस्ते मोफत शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले. कुकडीचे अध्यक्ष राहुल जगताप यांच्या हस्ते पिंपळगाव पिसा येथे तर सभापती मीना देवीकर (देवदैठण), हरिदास शिर्के (पेडगाव), प्रतिभा पाचपुते (काष्टी), अनुराधा नागवडे (वांगदरी), बाळासाहेब नाहाटा (भानगाव), आण्णासाहेब शेलार (बेलवंडी), गटविकास अधिकारी रूपचंद जगताप व गटशिक्षणाधिकारी शेषराव बडे (कोथुळ) यांच्या हस्ते पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले़ नेते व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले़ त्यामुळे चिमुकलेही हरखून गेले़सहा शाळांना अभयतालुक्यात १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सहा शाळा होत्या. या शाळा १६ जूनपासून बंद करण्यात येणार होत्या़ परंतु राज्य सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे बंद होणाऱ्या सहा शाळा सुरू ठेवण्यास तुर्त अभय मिळाले आहे.गणवेशाचा निधीपहिल्याच दिवश्ी १४ हजार १०३ विद्यार्थ्यांना २०० रुपये प्रमाणे २८ लाख २० हजार रुपये शळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आला.आदिवासी शिष्यवृत्तीतालुक्यात १ हजार २०० आदिवासी विद्यार्थ्यांची १८ लाखाची शिष्यवृत्तीची रक्कम शाळांच्या खात्यावर जमा झाल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत होईल़२० कलमी कार्यक्रमगुणवत्ता वाढीसाठी शिक्षण खात्याचा २० कलमी कार्यक्रम पहिल्या दिवसापासून राबविण्यास प्रारंभ झाला़ त्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धीक दर्जा व शाळांचा लुक बदलणार आहे.
आता पहिलीपासून शिका सेमी इंग्रजी!
By admin | Updated: June 17, 2014 00:37 IST