शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात आता २० जूननंतर पाऊस - डॉ. रवींद्र आंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 13:50 IST

भाऊसाहेब येवले राहुरी : शहरासह जिल्ह्यात दोन ते तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. मान्सूनचे अद्याप राज्यातच आगमन झालेले नाही. ...

भाऊसाहेब येवलेराहुरी : शहरासह जिल्ह्यात दोन ते तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. मान्सूनचे अद्याप राज्यातच आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागातील तज्ज्ञ डॉ. रवींद्र आंधळे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद!प्रश्न : मान्सूनचा सध्याचा प्रवास?डॉ. आंधळे : यंदा अहमदनगर जिल्ह्यात पावसाने बे्रक दिल्याचे चित्र समोर आले आहे़ येत्या चार दिवसात तुरळक स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडणार आहे़ वायू वादळाने मान्सूनची प्रगती थांबली आहे. कर्नाटकापर्यंत पाऊस आला आहे.प्रश्न : कधी येईल पाऊस?डॉ. आंधळे : येत्या चार दिवसात नगर जिल्ह्यात समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ दोन मिलीमीटर पावसाची काही ठिकाणी शक्यता आहे़ ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे़ पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या ठप्प झाल्या आहेत़ येत्या आठ दिवसात तरी समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़प्रश्न : शेतीत सध्याचे काय चित्र आहे.डॉ. आंधळे : शेतकऱ्यांनी जमिनीच्या मशागती केल्या आहेत़ बियाणेही खरेदी केले आहे़ मात्र पाऊस नसल्याने पेरणी करायची कशी? असा प्रश्न शेतकºयांपुढे आहे़ काही शेतकºयांनी हलक्या पावसावर कपाशीची लागवड केली़ मात्र विजेचा लपंडाव व पाण्याची टंचाई यामुळे कपाशीची लागवड वाया गेली आहे़ कृषी सेवा केंद्र चालकांनी पुरेशा प्रमाणावर बियाणे खरेदी केले आहे़ मात्र बियाणाला उठाव नसल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांकडून सांगण्यात आले़प्रश्न : शेतकरी राजाची अवस्था काय आहे?डॉ. आंधळे : अहमदनगर जिल्ह्यात गेल्यावर्षी २९४ मिली पावसाची नोंद झाली होती़ जिल्ह्यात गेल्यावर्षी केवळ ४४ टक्के पाऊस पडल्याने शेतीचे डोलारा कोसळला़ शेतकºयांवर कर्जाचा भार वाढला. तर दुसºया बाजूला सहकारी सोसायट्या व बँका धोक्यात आल्या आहेत़ गेल्या वर्षी जूनच्या सुरूवातीला पाऊस पडला़ त्यानंतर पावसानेदडी मारली होती़ त्यामुळेगेल्यावर्षी खरीप हंगाम वाया गेला होता़ यंदा शेतकºयांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे़ त्यामुळे शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़प्रश्न : पेरण्या कधी कराव्यात.डॉ. आंधळे : समाधानकारक पावसासाठी आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़ येत्या चार दिवसात समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ दोन-चार मिलीमीटर पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो़ जून अखेरपर्यंत पेरण्या करणे शक्य आहे़ उशिरा पेरण्या करण्याचे ठरले तर उशिरा येणाºया वाणाची पेरणी करावी लागेल़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर