शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सावेडी दूध संघाच्या जागा विक्रीप्रकरणी नोटिसा : जागेची बेकायदेशीर विक्री प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:33 IST

पूर्वीच्या जिल्हा दूध संघाच्या व आताच्या सात तालुका दूध संघाच्या मालकीच्या सावेडी येथील जागेच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी निविदेतील अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी बुºहाणनगर येथील बाणेश्वर दूध संस्थेचे प्रतिनिधी रोहिदास कर्डिले यांनी याचिका दाखल केली होती.

केडगाव : पूर्वीच्या जिल्हा दूध संघाच्या व आताच्या सात तालुका दूध संघाच्या मालकीच्या सावेडी येथील जागेच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी निविदेतील अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी बुºहाणनगर येथील बाणेश्वर दूध संस्थेचे प्रतिनिधी रोहिदास कर्डिले यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान औरंगाबाद खंडपीठाने दुग्ध विकास विभागाचे सचिव, सहनिबंधक व जागेचे खरेदीदार साई मिडास यांना १३ आॅगस्टला म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा काढल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत कर्डिले म्हणाले, नगर जिल्हा दूध संघ व त्यानंतर नगर, पारनेर, कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड व शेवगाव या सात तालुका संघाच्या मालकीची सावेडी येथील ८९ गुंठे जागेची २७ कोटी ११ लाख रुपयांना बोली लावत साई मिडास रियालिटिजने खरेदीची तयारी दाखविली आहे. २२ जानेवारी २०१८ प्रसिद्ध झालेल्या निविदेत या जागेच्या बाजारमूल्यांकनाची रक्कम दिली नाही. त्यामुळे अनेक इच्छुक खरेदीदारांना निविदा भरता आल्या नाहीत. शेवटच्या टप्प्यात व्यंकटेश डेव्हलपर्स २४ कोटी ३ लाख, संत नागेबाबा मल्टिस्टेट २२ कोटी २२ लाख २२ हजार ा्रुपये व साई मिडास २४ कोटी ११ लाख रुपयांच्या निविदा दाखल केल्या. दूध संघाच्या प्रतिनिधींनी खरेदीदारांसमवेत जास्तीत जास्त रक्कम मिळावी, यासाठी चर्चेच्या फेऱ्या केल्या. त्यानुसार दुसºया तौलनिक तक्त्यात व्यंकटेश डेव्हलपर्सने २७ कोटी, साई मिडासने २४ कोटी ११ लाख ११ हजार व नागेबाबा मल्टिस्टेटने २२ कोटी ७५ लाख रुपयांची बोली लावली. तिसºयावेळी व्यंकटेश डेव्हलपर्सने २७ कोटींची बोली कायम ठेवली. तर साई मिडासने २५ कोटी ११ लाख रुपयांची बोली लावली. त्यानंतर दूध संघाच्या प्रतिनिधींनी अंतिम बोली असल्याचे सांगत साई मिडासने २७ कोटी ११ लाख रुपयांची बोली लावली. त्यावेळी व्यंकटेश डेव्हलपर्सने २७ कोटी बोली कायम ठेवल्याचे दूध संघाच्या इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र २७ कोटी ११ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता असतानाही दूध संघाच्या प्रतिनिधींनी इतर निविदाधारकांना डावलल्याचा आरोप कर्डिले यांनी केला आहे.औरंगाबादच्या युनायटेड जनसेट फर्मने ३० कोटी रुपयांना ही जागा खरेदीची तयारी असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केल्याची माहितीही कर्डिले यांनी दिली. बाणेश्वर दूध संस्थेच्या वतीने अ‍ॅड. नितीन गवारे, अ‍ॅड. संजय गायकवाड यांनी न्यायालयात बाजू मांडली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर