शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

असीम सरोदे यांनी ईडीला पाठवली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:21 IST

भोसरी औद्योगिक वसाहतीतील भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसेंवर खटला सुरू आहे. या प्रकरणात अंजली दमानिया तक्रारदार असून त्यांच्यावतीने ॲड. सरोदे ...

भोसरी औद्योगिक वसाहतीतील भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसेंवर खटला सुरू आहे. या प्रकरणात अंजली दमानिया तक्रारदार असून त्यांच्यावतीने ॲड. सरोदे हा खटला लढवत आहेत. या प्रकरणाची काही कागदपत्रे ईडीला चौकशीसाठी हवी आहेत. ईडीचे सहायक संचालक राजेश कुमार यांनी २९ डिसेंबर २०२० रोजी दूरध्वनी करुन सरोदे यांच्याकडे या कागदपत्रांची मागणी केली. सरोदे यांनी याबाबत अधिकृत मेल करा असे सांगितले. त्यानंतर ईडीच्या कार्यालयातून तसा मेल पाठविण्यात आला. कागदपत्रे हवी असतील तर झेरॉक्सचा खर्च आपल्याला करावा लागेल तसेच ही कागदपत्रे ईडीने आपला अधिकृत प्रतिनिधी पाठवून माझ्या कार्यालयातून घेऊन जावीत, असे सरोदे यांनी उलटटपाली कळविले. सरोदे यांच्याकडून कागदपत्रे घेण्यासाठी ईडीच्या कार्यालयातून ५ जानेवारी रोजी पुणे येथे राकेश नावाचा एक व्यक्ती आला. सरोदे यांनी त्याच्याकडे ओळखपत्र व ईडीने त्याला प्राधिकृत केल्याचे पत्र मागितले असता तो देऊ शकला नाही. त्यानंतर या व्यक्तीने संचालकांशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली व तो कागदपत्रे न घेता निघून गेला. माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते म्हणून मी कागदपत्रे घेऊन जाऊ शकत नाही, असे कारण त्याने दिले.

याबाबत ईडीच्या सहायक संचालकांना नोटीस पाठवून सरोदे यांनी नाराजी नोंदवली आहे. ईडी ही नामवंत शासकीय संस्था असून त्यांनी अनधिकृत व्यक्तीमार्फत महत्वाची कागदपत्रे हस्तगत करणे गैर आहे. तसेच या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यापोटी आलेला खर्च देण्याची तसदीही ईडीने घेतलेली नाही. आम्ही समाजातील वंचित घटकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला देण्याचे काम करतो. असे काम करताना आम्हाला व्यावसायिक कामातून मिळणारे शुल्क महत्त्वाचे असते. त्यामुळे ईडीने आमच्या झालेल्या खर्चापोटीचे पैसे पाठवावेत, असे सरोदे यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे. झेराॅक्स कॉपीचे १ हजार ३४० व नोटिसीचा १०० रुपये खर्च, अशा १ हजार ४४० रुपयांच्या वसुलीसाठी ही नोटीस त्यांनी धाडली आहे. सरोदे नगर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता या माहितीस त्यांनी दुजोरा दिला.

......

केंद्र सरकारच्या अंतर्गत २००५ पासून कार्यरत असलेला सक्त वसुली संचालनालय हा एक जबाबदार विभाग आहे. आता तर सीबीआयपेक्षाही ईडीकडे जास्त अधिकार आल्याचे दिसत आहे. आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना पायबंद घालणे हे ईडीचे काम आहे. आर्थिक व्यवहार पारदर्शी करावेत असे ईडी सांगते. याच ईडीकडे माझे १ हजार ४४० रुपये बाकी आहेत. हे पैसे ईडीने मला परत करावेत यासाठी मी त्यांना नोटीस पाठविली आहे. माझी नोटीस ईडीला २८ जानेवारी रोजी मिळाली आहे.

- ॲड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते