शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेत सुधारणा करण्याच्या पालिकेला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 19:38 IST

शहरातील सार्वजनिक शौचालये दुरुस्त करण्यासह खत प्रकल्पांच्या कामाला वेग देण्याच्या सूचना नाशिक येथील विभागीय उपसंचालक संगीता धायगुडे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत़

अहमदनगर: शहरातील सार्वजनिक शौचालये दुरुस्त करण्यासह खत प्रकल्पांच्या कामाला वेग देण्याच्या सूचना नाशिक येथील विभागीय उपसंचालक संगीता धायगुडे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत़ तसेच सफाई कामगारांमध्ये असलेले नैराश्य घालविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत़शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी नाशिक येथील विभागीयउपसंचालक धायगुडे यांचे पथक मंगळवारी सकाळी नगरमध्ये दाखल झाले़ या पथकाने महापालिकेच्या सावेडी येथील खत प्रकल्पासह शहरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली़ पाहणी दरम्यान शहरातील सार्वजनिक शौचालये नादुरुस्त असल्याचे आढळून आले़ सार्वजनिक शौचालयांचा स्वतंत्र आराखडा तयार करून ते दुरुस्त करण्याची सूचना यावेळी पथकाने दिली़ याअभियानांतर्गत घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, ओला सुका वेगळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे, यासाठी गुण आहेत़ त्याची पथकाने शहरातील ठिकठिकाणी भेट देऊन पाहणी केली असून, काही सुधारणा सुचविलेल्या आहेत़ सुचविलेल्या सुधारणा येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे़केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात राज्यभरातील महापालिका नगरपालिकांनी अनेक उपाययोजना केल्या़ परंतु, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहिला़ त्यामुळे केंद्रीय समिती येण्यापूर्वी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विभागीय स्तरावरील पथके तयार करण्यात आली आहे़ ही पथके महापालिकांना भेटी देऊन कागदपत्रांची तपासणी करण्याबरोबरच जागेवर जाऊन पाहणी करत आहेत़अहमदनगर महापालिकेची जबाबदारी नाशिक येथील उपसंचालकांकडे सोपविण्यात आली असून, त्यांच्या पथकाने नगरला भेट देत सफाई कामगारांशीही संवाद साधला़ तसेच त्यांना योगा व प्राणायामचेही धडे दिले़ येत्या पंधरा दिवसांत त्यांना योगाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर