श्रीरामपूर : महाराष्ट्रासह देशातील एकूण २१० साखर कारखान्यांना केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयांतर्गत असलेल्या साखर संचालनालयाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.सन २०१२-१३ मधील साखर हंगामातील गाळपाची विवरणपत्रात सविस्तर माहिती सादर न केल्याने आपल्याविरूद्ध केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे उल्लंघन केल्यामुळे कारवाई का करू नये, अशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसा बजावल्यापासून या कारखान्यांनी १५ दिवसात प्रपत्र १ ते ४ मधील आवश्यक ती माहिती केंद्रीय साखर संचालनालयास सादर न केल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ७ नुसार कारवाई करून या कारखान्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा या संचालनालयाचे उपसंचालक सुधीरकुमार जैस्वाल यांनी कारखान्यांना स्पीड पोस्टाने नोटिसांद्वारे देण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ७२ कारखान्यांचा समावेश आहे. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर, विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे यांच्या आंबेगावसह अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा अशोक, राहुरीचा तनपुरे कारखाना, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा हिरडगावचा साईकृपा यांचाही यात समावेश आहे. याशिवाय सन २०१३-१४ च्या हंगामाची आॅनलाईन माहिती प्रपत्रे, विवरणपत्रे मार्च २०१४ पर्यंत न भरल्याने नृसिंह (परभणी), केदारेश्वर (शेवगाव), आजरा (कोल्हापूर),पद्मश्री विठ्ठलराव विखे (केज, बीड), कडा (बीड), अंबाजोगाई (बीड), मराठवाडा (हिंगोली),तुळजाभवानी (तुळजापूर), विश्वास (शिराळा, सांगली), वसंतदादा (सांगली), वसंतराव दादा पाटील (देवळी, नाशिक), के.के.वाघ (निफाड, नाशिक) या कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)राज्यातील कारखानेनिफाळ, पळसे, विटेवाडी, अशोकनगर, राहुरी,निरा, सांगली, वाळवा, इचलकरंजी, कागल, माळीनगर, कन्नड, सातपुडा, डोंगरकडा, पाथरी, गजानन, राजाराम, इंदापूर, राजगड, माजलगाव, मंगरूळ, केज, सांगोला, कोरेगाव, लोहगाव, संत तुकाराम, उजना, अक्कलकोट, मुदखेड, वांगी, आंबेगाव, सोनावदे, रायगाव, लोकमंगल, द्वारकाधीश, शेवाळेवाडी, दिनदयालनगर, लक्ष्मीनगर, पवारवाडी, शहाजीनगर, हावरगाव, सोनगाव, कारणवाडी, शेषनगर, पिंपळगाव, गागर, पारगाव, डोकाटे, टाकळीवाडी, कुऱ्हा, अनुराज,शेटेफळगडे, म्हाळुंगे, भांडारकवठे, तिर्थपुरी, समृद्धी, धामोरी, जयवंत, हेमरस, पिंपळदरा,हिरडगाव, तळेगाव, जातेगाव, आर्यन शुगर्स, मातोश्री शुगर्स, लाखांदूर, बाणगंगा शुगर, श्री श्री शुगर,खर्डा, चंदापुरी, महाशुगर,जयलक्ष्मी शुगर प्रा.
२१० कारखान्यांना नोटिसा
By admin | Updated: June 12, 2014 00:09 IST