शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

उचल फिटली नाही, घरी जायचे कसे? हजारो ऊस तोडणी कारखाना कार्यक्षेत्रात मजूर अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 14:18 IST

नगर, शेवगाव, जामखेड, पाथर्डी, बीड भागातील हजारो ऊसतोडणी कामगार साखर कारखाने सुरु असल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडकून पडले आहेत. अद्याप उचल फिटली नसल्याने गावी जायचे तरी कसे? या विवंचनेत त्यांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अनिल साठे/ शेवगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.२४ ) मंगळवारी रोजी देशातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव या संदर्भात जनतेला संबोधित करतांना 'तुम्ही आहे तिथेच राहा' असे सांगितले आहे. या परिस्थितीत नगर, शेवगाव, जामखेड, पाथर्डी, बीड भागातील हजारो ऊसतोडणी कामगारसाखर कारखाने सुरु असल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडकून पडले आहेत. अद्याप उचल फिटली नसल्याने गावी जायचे तरी कसे? या विवंचनेत त्यांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊसतोडणी मजुरांनी मागील वर्षी राज्यातील तसेच पर राज्यातील विविध साखर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणावर उचल घेतली होती. मागील वर्षी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात दरम्यान ऊसतोडणीसाठी हजारो कुटुंब विविध कारखान्याच्या कार्यक्षेत्रात स्थलांतरीत झाले होते. पती, पत्नी ऊस तोडायला गेली आहेत. त्यांच्यातील बहुतांश मजुरांचे वृध्द आई, वडील,लहान मुले गावीच आहेत. सध्याच्या परिस्थितीत राज्यासह परराज्यातील अनेक साखर कारखाने सुरू आहे. शेवगाव, पाथर्डी, जामखेड भागातील सुमारे दोन हजार ऊस तोडणी कामगार कारखाना स्थळावर कार्यरत आहेत. सदर कामगारांना जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने त्यांची तिथे गैरसोय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक गावकरी मजुरांना किराणा सारख्या अत्यावश्यक वस्तू देण्यास व गावात येण्यास मनाई करीत असल्याने कामगारांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ‘लोकमत’शी बोलताना एका मुकादमाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही घेतलेली उचल अद्याप फिटली नाही. येथील स्थानिक लोक आम्हाला किराणा दुकानात येण्यास मज्जाव करीत आहेत. हव्या त्या सुविधा कारखाना प्रशासनाकडून मिळत नाहीत. घेतलेली उचल अंगावर पडल्यावर आम्ही जगायचे कसे? वर्षभर मुलांचे शिक्षण, संसाराचा खर्च कसा भागणार. आम्हाला गावी यायचे म्हटले तर साधने मिळत नसल्याचे सांगितले.पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर साखर कारखाना स्थळावर पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील तब्बल ८० बैलगाडी आहे. इथं आम्ही २०० ते ३०० लोक आहोत. आम्हाला येथील स्थानिक लोक साधा किराणा घेण्यासाठी गावात येऊ देत नाही. कारखान्याकडून कामाची घेतलेली उचल अद्याप फिटली नाही. त्यात आमच्या जीविताला कोरोना रोगाचा संसगार्चा धोका वाढला आहे. प्रचंड भीती वाटते. पण घेतलेल्या  उचलीचे करणार तरी काय..?, असेही ऊसतोडणी मजुरांसह मुकादमाने सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेLabourकामगार