शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची आर्टबाबत अनास्था; ‘विज्ञान’कडेच ओढा

By admin | Updated: July 4, 2016 23:48 IST

योगेश गुंड , अहमदनगर विविध विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी तसेच सध्या महाविद्यालय परिसरात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे़ अकरावी प्रवेशासाठी सर्वांची झुंबड सुरूअसली तरी

योगेश गुंड , अहमदनगरविविध विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी तसेच सध्या महाविद्यालय परिसरात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे़ अकरावी प्रवेशासाठी सर्वांची झुंबड सुरूअसली तरी शहरातील जवळपास १० हजार विद्यार्थांचा कल विज्ञान शाखेकडे तर ४ हजार विद्यार्थी वाणिज्य शाखेसाठी उत्सुक आहेत. मात्र कला शाखेकडे उपलब्ध जागेएवढेही अर्ज न आल्याने कला शाखा विद्यार्थ्याविना कासावीस झाली आहे. कॉलेजची कला शाखा बंद पडू नये म्हणून आता शहरातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कला शाखेला विद्यार्थी देता का म्हणून शोधमोहीम सुरु केली आहे.अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा सर्वात जास्त विज्ञान शाखेकडे दिसून येत आहे. यामुळे शहरातील नामांकित कॉलेजमधून विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध जागेपेक्षा सहा पट जास्त अर्ज आले आहेत. यामुळे अनुदानित जागांचा ‘कट आॅफ’ ९२ टक्क्यापर्यंत गेला आहे. नगर शहरातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या २००० जागा आहेत तर प्रवेशासाठी तब्बल ९०२० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कनिष्ठ विद्यालय धरून ही संख्या १० हजारांपुढे जाते. विज्ञान शाखेखालोखाल वाणिज्य शाखेकडे विद्यार्थी वळले आहेत. शहरात वाणिज्य शाखेच्या १४४० जागा उपलब्ध आहेत़ या शाखेत प्रवेशासाठी ३७३२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. शहरात सर्वाधिक म्हणजे जवळपास ३ हजारपेक्षा जास्त जागा असलेल्या कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी अक्षरश: पाठ फिरवली आहे कारण उपलब्ध जागेएवढे अर्जही दाखल न झाल्याने कला शाखेतील प्रवेश क्षमता कशी पूर्ण होणार या काळजीत आता कला शाखेचे प्राध्यापक पडले आहेत. कला शाखेत विद्यार्थ्यांची असणारी अनास्था कॉलेजसाठी चिंतेचा विषय बनली आहे. उपलब्ध जागेएवढे विद्यार्थी मिळाले नाही तर अनुदानित प्राध्यापक अतिरिक्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ज्या कॉलेज मध्ये विज्ञान प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे त्याच नामांकित कॉलेजचे प्राध्यापक शहर व उपनगरात फिरून विद्यार्थ्यांना कला शाखेकडे चला म्हणून विनवण्या करीत आहेत.यासाठी कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थ्यांचा सर्व्हे करून कला शाखेकडे मुले आणण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.