शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

टँकर नकोत, पाईपलाईन हवी !

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

अहमदनगर : चोहोबाजूंनी एमआयडीसीमधील कारखाने आणि मध्यभागी वसलेला परिसर म्हणजे मनमाड रोडवरील माताजीनगर !

अहमदनगर : चोहोबाजूंनी एमआयडीसीमधील कारखाने आणि मध्यभागी वसलेला परिसर म्हणजे मनमाड रोडवरील माताजीनगर ! ‘खेडे बरे, अशी अवस्था या भागाची आहे. आठ दिवसांनी येथे एकदा टँकरने पाणी येते. मात्र, या टँकरलाही आता नागरिक कंटाळले आहेत. टँकर नको, आता आम्हाला पाईपलाईन हवी आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी आले पाहिजे. पंधरा वर्ष झगडतोय. मात्र, नळ काही घरात येत नाहीत. शेजारच्या क्लबमध्ये पोहायला पाणी आहे. मात्र, आम्हाला प्यायला पाणी नाही’, अशा संतप्त भावना माताजीनगर परिसरातील महिला-नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामालगत माताजीनगर ही दोनशे घरांची वसाहत आहे.चोहोबाजूंनी एमआयडीसीमधील कारखाने आणि मध्यभागी ही वसाहत आहे. या वसाहतीला लोकमत टीमने मंगळवारी सकाळी भेट दिली. या वसाहतीच्या शेजारी एमआयडीसी, महापालिकेची पाईपलाईन जाते. मात्र, या भागाला अद्याप नळाद्वारे पाणी मिळत नाही. आठ दिवसांनी एखादा टँकर येतो. त्यावरच आठ दिवस काढावे लागतात. एमआयडीसीतील नोकरदार-कामगार वर्ग असल्याने ही वसाहत तशी सुशिक्षितांची आहे. मात्र या वसाहतीच्या विकासाकडे अद्याप सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. माताजीनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याबाबत नागरिकांनी एमआयडीसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. रस्ता, ड्रेनेजलाईन, कचराकुंडी अशा कोणत्याच सुविधा वसाहतीमध्ये नाहीत. दोन-तीन ठिकाणी पथदिवे आहेत. डीपीचा सांगाडा उभा आहे. विजेचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने वसाहत अनेकवेळा अंधारात असते. शौचालयांसाठी शोषखड्डे आहेत. सांडपाणी रस्त्यावर सोडले जाते. गटारी, ड्रेनेजलाईन अशा सुविधा नसल्याने या वसाहतीला खेड्यासारखी अवकळा आली आहे. मात्र येथील नागरिक सुशिक्षित असल्याने प्रत्येकाने घरासमोर स्वच्छता, टापटीप ठेवली आहे. कॉलनीच्या एका बाजूला कचऱ्याचे ढिगारे आहेत. कचरा उचलण्यासाठी घंटागाडी कधीच येत नाही. मनपाच्या मालकीचा मोकळा भूखंड एकाने भाजीपाला लावण्यासाठी ताब्यात घेतला आहे. मुलांना खेळण्यासाठी उद्यान-मैदान अशा कोणत्याही सुविधा नाहीत. रस्ते धुळीने माखलेले आहेत. एकाच लाईनमध्ये पथदिवे आहेत, इतरत्र अंधार. उर्वरित प्रतिक्रिया पान ४ वरमतदार नसलेला प्रभागमाताजीनगरमध्ये ११२ घरे आहेत. सहाशेच्यावर लोकसंख्या आहे. २००० साली वसाहत स्थापन झाली आहे. येथील नागरिकांनी २००८ मध्ये शेवटचे मतदान केले. त्यानंतर मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. केवळ २२ जणांनीच २०१३ च्या महापालिका निवडणुकीत मतदान केले. ही नावे कोणी वगळली? हे कळत नाही. मतदार नसल्याने विकास कामांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. घरपट्टी घेतली जाते, मग मतदार का नाही? असा नागरिकांचा सवाल आहे.ज्येष्ठ नागरिकाचा लढा : माताजीनगर परिसराच्या विकासासाठी ज्येष्ठ नागरिक विष्णू यादव भोर लढा देत आहेत. त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे माजी आमदार अनिल राठोड यांनी जिल्हा नियोजनला २००५ साली पत्र दिले होते. त्यांच्या पत्रामुळे एमआयडीसीने फक्त तीन दिवस पाणी दिले. रस्ते नाहीत, तर विकास आराखडा कसा मंजूर झाला, हा मोठा प्रश्न आहे. महापालिकेने एमआयडीसीकडून पाणी घ्यावे आणि ते आम्हाला द्यावे, असा भोर यांचा प्रस्ताव आहे. त्यांनी माताजीनगर सोसायटी स्थापन केली आहे. या सोसायटीद्वारे पाणी विकत घेण्याचा दुसरा पर्याय त्यांनी ठेवला आहे. सर्व नकाशे, पाठपुराव्याची पत्रे त्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधींना दाखविली.