शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
3
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
4
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
5
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
6
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
7
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
8
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
9
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
10
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
11
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
12
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
13
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
14
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
15
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
16
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
17
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
18
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
19
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
20
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार

   नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:57 IST

हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवन मुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल. 

                  यावत्पनो निवासति गेहे तावतपृच्छति कुशलं गेहे             गतवती वायौ देहापाये, भार्या बिभ्यति तस्मिन काये       भज गोविंदमभज गोविंदमभज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥ ८ 

--------------------------------------(भज गोविन्दम-८) ....................................................

या श्लोकात जीवनातील वास्तव प्रतिपादन केले आहे. जोपर्य$ंत या देहात प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंतच तुमची घरातील लोक विचारपूस करतात. एकदा का तुमच्या शरीरातील प्राण, श्वास निघून गेला की मग या देहाला घरात कोणी ठेवीत नाहीत. लवकरात लवकर घराबाहेर काढतात व स्मशानात नेवून त्याचे दहन करतात. जीवनभर कितीही तुमच्यावर प्रेम केलेले असू द्या. प्रेतरूप शरीराला घरात ठेवीत नाहीत. इतकेच काय तर जी पत्नी आयुष्यभर तुमच्यार प्रेम करते ती सुद्धा त्या प्रेताला हात लावीत नाही. उलट ती घाबरते.  आणि समजा ठेवले तरी त्यामध्ये चैतन्य येत नाही. ते प्रेत जिवंत होत नाही.

हजारो वषापूर्वी इजिप्तमध्ये पिºयामिडमध्ये राजे लोकांचे देह ठेवण्याची प्रथा होती. त्याबरोबर दाग दागिने ठेवायचे. त्याच्या आवडत्या वस्तू ठेवायचे. पण आता संशोधन झाले आणि ते पिºयामीड खोदून बघितले तर त्या ममी म्हणजे जतन केलेले प्रेत तसेच होते. ते काही जिवंत झालेले दिसले नाही. तात्पर्य जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तोपर्यंतच लोक या देहाला जपतात. नंतर कोणीही विचारीत नाही, हे वास्तव आहे. पण याचा कोणी विचार करीत नाही. एके ठिकाणी फार छान सांगितले आहे. 

ऐक चतुरा सोड फुगारा उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपले कोणी नाही. 

या मायेच्या बाजारात आपले कोणी नाही. फक्त आपले आहेत, असे भासते. श्री संत ज्ञानोबाराय  म्हणतात, मातापिता बंधू बहिणी, कोणी न पवती निर्वाणी । इष्टमित्रस्वजनसखे हे तो सुखाची मांडणी।   एकला मी दु: ख भोगी कुंभपाक जाचणी । तेथे कोणी सोडविना एका सदगुरुवांचुनी॥ धर्म जागो सादैवाचा जे बा परोपकारीअंतकाळी कोणीही वाचवू शकत नाही. फक्त एक सद्गुरूच वाचवितात. म्हणजे ते काही जीवंत करीत नाहीत. पण मृत्यू सुकर करतात. या देहाचे मिथ्यत्व पटवून देतात. त्यामुळे देह सोडतांना सुद्धा दुख: होत नाही. उलट हा देह माझा नाही हे कळते. देह पंचमहाभूतांचा आहे. देह कोणाचाच या इहलोकात राहू शकत नाही.

श्री ज्ञानोबारायांनी मदालसा नावाच्या सुंदर प्रकरणातील अभंगात देहाचे मिथ्यात्व प्रतिपादन केले आहे. ते म्हणतात,

हा देहो नाशिवंत मळमुत्रांचा बांधा, वरी चर्म घातलें रे, कर्म कीटकांचा सांदा रवरव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भंरवसा पुत्रा न धरावा ऐसा माझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसा. बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा, तृष्णा सांडूनियां योगी गेले वनवासा

मदालसाने आपल्या मुलांना पाळण्यातच हा उपदेश केला आणि विशेष म्हणजे तिचे पुत्र हा उपदेश ऐकून संन्यासी झाले. म्हणून देहाचे नश्वरत्व कळावे आणि आता तर सध्या कोरणाची साथ सुरु आहे. जगातील सर्व लोकांना कळून चुकले की, मानवी जीवन हे किती पराधीन आहे. पैसा, धन, द्रव्य काहीही उपयोगाला येत नाही. नव्हे जर कोरोना झालाय एव्हढे जरी कळाले तरी कोणीही जवळ येत नाही आणि कदाचित जर माणूस कोरनाने मेला तर त्याच्या प्रेताला सुद्धा हातही लावीत नाही. कुठलेही धार्मिक संस्कार सुद्धा होत नाहीत. लगेच उचलतात आणि स्मशानात नेवून चितेवर जाळून टाकतात. 

नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा रे चौधरी, आणिक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविणा कुणी, एका चक्रपाणी वाचुनी 

म्हणून हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवन मुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल. 

-भागावाताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले गुरुकुल भागवताश्रम ,चिचोंडी (पाटील) ता. नगर मोब. ९४२२२२०६०३ 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक