शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ना भोंगा, ना बॅनर, ना जेवणावळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 03:11 IST

हिवरेबाजारमध्ये ३५ वर्षांनंतर निवडणूक; साध्या पद्धतीने प्रचार

साहेबराव नरसाळे

अहमदनगर : बिनविरोध गावांमध्ये निवडणूक लागताच यावर्षी नुस्ता धिंगाणा उभा राहिला. मात्र, याला अपवाद ठरले ते हिवरेबाजार! हिवरेबाजारमध्ये ३५ वर्षांनंतर निवडणूक लागली. मात्र, गावात ना भोंगा वाजला, ना बॅनर लागले, ना जेवणावळी उठल्या. उमेदवारांनी साध्या पद्धतीने प्रचार करीत विकासाच्या मुद्यावर मत मागितले.

हिवरे बाजार (ता. अहमदनगर) हे राज्याच्या आदर्श गाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे गाव. या गावात १९८५ नंतर प्रथमच निवडणूक लागली. हिवरेबाजारचे माजी सरपंच उत्तमराव संबळे यांचे चिरंजीव प्रा. किशोर संबळे यांनी पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनेल उभे केले. पॅनेलच्या प्रचारासाठी त्यांनी सर्व परवानगी घेतल्या. घरोघर जाऊन प्रचार केला. गावातून रॅली काढून संबळे यांनी प्रचाराची सांगताही केली. 

निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा भाग आहे. यावर्षी गावात निवडणूक लागली. पण ही निवडणूकही आम्ही आदर्श पद्धतीनेच करण्याचा चंग बांधला होता. आम्ही घरोघर जाऊन विकासाच्या मुद्यावर मत मागितले. कुठेही बोर्ड लावला नाही. प्रचाराची गाडी फिरविली नाही. कुणावरही आरोप केले नाहीत. त्यापासून आम्ही सर्वजण अलिप्त राहिलो.    - पोपटराव पवार,     माजी सरपंच, हिवरेबाजार

आम्ही घरोघर फिरून प्रचार केला. गावातून रॅली काढून प्रचाराची समाप्ती केली. माझे वडील सरपंच होते. म्हणून मीही निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. त्यासाठी सर्व सात जागांवर उमेदवार दिले आहेत. प्रचारात आम्ही कुणावरही आरोप केलेले नाहीत. फक्त आमची भूमिका मतदारांसमोर मांडली.    - प्रा. किशोर संबळे, हिवरेबाजार

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर