शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडेसाठी खासदारांकडून एक रुपयाचा निधी नाही : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:26 IST

दुष्काळी भागाकरीता आपण निळवंडे धरण पूर्ण केले.

तळेगाव दिघे : दुष्काळी भागाकरीता आपण निळवंडे धरण पूर्ण केले. बोगदे व काही प्रमाणात कालव्यांची कामे केली. मात्र मागील पाच वर्षात या कालव्यांसाठी विद्यमान खासदारांकडून एक रुपयाचाही निधी आला नाही. काहीही काम झाले नाही. २२०० कोटी मिळाल्याची फक्त घोषणा असून विद्यमान खासदारांनी फक्त फोटोबाजी केली, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली. निळवंडेचे कालवे आपणच पूर्ण करु, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.शिर्डी लोकसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ निमोण, नान्नज दुमाला, चिंचोलीगुरव, तळेगाव दिघे येथे आयोजित बैठकांमध्ये थोरात बोलत होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, भाऊसाहेब कुटे, महेंद्र गोडगे, बी. आर. चकोर, गणपत सांगळे, प्रभाकर कांदळकर, नामदेव दिघे, सुभाष सांगळे, ज्ञानेश्वर सांगळे, साहेबराव गडाख, अविनाश सोनवणे, भारत मुंगसे, बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, अनिल घुगे, साहेबराव आंधळे, जबाजी मंडलीक, सुदाम गायकवाड, दत्तू सांगळे, धनंजय मुंडे, विष्णू ढोले, तात्यासाहेब दिघे, अनिल कांदळकर, रंगनाथ मंडलीक, बबन कोटकर, देवराम गुळवे, रोहिदास सानप, भाऊपाटील कोटकर, प्रमिला बर्डे, विजय गोडगे, अ‍ॅड. केशव गोडगे आदी उपस्थित होते.आ. थोरात म्हणाले, मुंबईत राहिल्यामुळे त्यांना या भागाचे प्रश्न माहित नाही. दुसऱ्या अपक्ष उमेदवाराने दोन-तीन पक्षबदल केले. त्यांची पक्षनिष्ठा तपासा. सत्तेसाठी निष्ठा बदलणारी काही मंडळी आहे. त्यांनाही धडा शिकवा. निळवंडे हे मीच पूर्ण केले आणि ठामपणे सांगतो, कालवेही पूर्ण करणारच. बाबा ओहोळ, सचिन दिघे, महेंद्र गोडगे, बी.आर.चकोर, गणपतराव सांगळे, अविनाश सोनवणे यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019