शिर्डी : सध्याच्या परिस्थितीत कोणताच एक्झीट पोल योग्य नाही. १६ मे नंतर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे मत देशाचे माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच़ डी़ देवेगौडा यांनी शिर्डीत व्यक्त केले़ देवेगौडा यांनी सोमवारी समाधी मंदिरात सार्इंच्या मध्यान्ह आरतीला सहकुटूंब हजेरी लावली़ दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना तिसर्या आघाडीविषयी भाष्य करण्यासाठी १६ मे ची प्रतिक्षा करण्याचा त्यांनी सल्ला दिला़ आताच्या परिस्थितीत एक्झिट पोलला काहीही अर्थ नसून मत मोजणीनंतर काँग्रेस, मोदी किंवा तिसर्या आघाडीचे सरकार येईल हे स्पष्ट होईल़ आताच त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. कारण सध्या कोणताही एक्झिट पोल अचूक ठरणार नसल्याचे देवेगौडा यांनी सांगितले़ आपण साईबाबांचे भक्त आहोत, त्यांच्या चरित्रातून आपल्याला ऊर्जा मिळते, यामुळे आपण नेहमी साईदरबारी येतो, असेही त्यांनी सांगितले़ यावेळी संस्थानच्या वतीने कार्यकारी अधिकारी अजय मोरे यांनी देवेगौडा कुटूंबाचा सत्कार केला़ याप्रसंगी नरेश पारख, मुकूंद कापरे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)
कोणताच एक्झिट पोल अचूक ठरणार नाही
By admin | Updated: June 27, 2023 12:06 IST