शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मीटर नाही, तरीही आले वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:42 IST

वीज मीटर जोडलेले नाही, वीज जोडणीसुद्धा दिलेली नसतानाही महावितरणने गडदवाडी येथील ग्राहकांना वीज बिले देण्याचा प्रकार केल्याने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

विनोद गोळेपारनेर : वीज मीटर जोडलेले नाही, वीज जोडणीसुद्धा दिलेली नसतानाही महावितरणने गडदवाडी येथील ग्राहकांना वीज बिले देण्याचा प्रकार केल्याने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.पारनेर-चिंचोली रस्त्याजवळील घाटात ही गडदवाडी आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने थेट या गावात जाऊन पाहणी केली असता गावात विजेचे खांब उभारण्यात आल्याचे दिसून आले. या खांबावरून वीज पुरवठा मिळून घरगुती वीज मीटर घेण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या पारनेर कार्यालयात मागील मे महिन्यात अर्ज केले. अर्जानंतर महिना होऊनही वीज जोडणी झाली नाही. वीज जोडणी लांबच राहिली. मात्र भाऊसाहेब पडवळ, बबन रभाजी कोठकर, डी. के. येवले, बापू कौठकर, सुखदेव कौठकर या ग्राहकांना थेट प्रत्येकी ३०९ रूपयांचे वीज बिल महावितरणने पाठविले. वीज मीटर नसतानाच वीज बिले हातात पडल्यावर या शेतकऱ्यांना धक्काच बसला.३१ युनिट वापराचे ३०९ रूपये बिलमहावितरण अंदाजे रिडींग देऊन वीज वापर बिल देत असल्याचा प्रकार अनेकदा घडतो. गडदवाडीत मात्र ग्राहकांना वीज जोडणी नसताना देखील ३१ युनिट वापर दाखवून ३०९ रूपये वीज बिल देण्यात आले आहे. वीज बिल विभागाच्या भोंगळ कारभाराचा ग्राहकांना नाहक भुर्दंड बसत आहे.आम्हाला अजून वीज जोडणी दिलेली नसताना वीज बिले दिली आहेत. हा गंभीर प्रकार असून वीज बिल विभाग सांभाळणाºयाविरूद्ध याबाबत दंड करून कारवाई करावी.- भाऊसाहेब पडवळ, शेतकरी, गडदवाडी.गडदवाडी कोणत्या विभागात येते याची माहिती घेऊन काय झाले ते पाहतो.- प्रशांत आडभाई, उपअभियंता, महावितरण, पारनेर

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर