शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यांना नाही, गोदावरीत पाणी सोडल्याने नागरिक संतप्त

By सचिन धर्मापुरीकर | Updated: July 13, 2024 14:21 IST

पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला असताना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये घालत पेरणी केली आहे. परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. अ

कोपरगाव (जि. अहमदनगर) : नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून कालव्यांऐवजी गोदावरी नदीत पाणी सोडल्याने शेतकऱ्यांसह कोपरगाव शहरवासीय संतप्त झाले आहेत. शहराला बारा दिवसांआड पाणी मिळते आहे, तर पावसाअभावी शेतकरी चिंतेत असताना, गोदावरीत पाणी सोडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्येही अद्याप अपेक्षीत पाण्याची आवक झालेली नाही. परंतू नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक शहर व निफाड तालुक्यात झालेल्या पावसामुळे बंधारा भरला आहे. त्यामुळे २०० क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले आहे. गोदावरी नदीत सोडलेले पाणी उजव्या व डाव्या कालव्यांना सोडले असते, तर शेतीसह शहराचा पाणी प्रश्न काही अंश सुटला असता. गोदावरीत पाणी सोडल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला असताना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये घालत पेरणी केली आहे. परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. अनेकांच्या बोअरवेल व वहिरींनी तळ गाठलेला आहे. विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह गाव खेड्यांना पिणी पुरवठा करणारे पाणी साठवण तलाव देखील कोरडे आहेत. कोपरगाव शहरातील नागरिकांना १२ दिवसाआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असताना, डोळ्यादेखत गोदावरीतून पाणी वाहून जात आहे.

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात सोडलेले पाणी जर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यात सोडले असते तर परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देता आले असते. पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे तलाव भरले असते. नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असता. परंतु पाटबंधारे खात्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने नियोजन करत ऐन दुष्काळात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून उजव्या व डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर व नागरिकांवर जणू केल्याची भावना निर्माण झाली आहे.

नांदूर मधमेश्वर धरणांतून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून कोपरगाव शहरवासीयांसह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाटबंधारे विभागाच्या या कृतीचा जाहिर निषेध व्यक्त करतो.

-सुनिल अंबादास देवकर, माजी सभापती, कोपरगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर