शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

निजामशाहीकालीन मर्दानखाना, कलावंतीणीच्या महालाला अवकळा ऐतिहासिक वास्तू भग्नावस्थेत : रस्त्याचे खस्ता हाल, महाल मोडकळीस; पायाभूत सुविधांअभावी पर्यटकांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:33 IST

निजामशाहीकालीन ऐतिहासिक वास्तुंचे वैभव असणाºया भातोडी परिसरातील कलावंतीणीचा महाल व मांजरसुंबा येथील मर्दानखाना पर्यटनाच्या सुविधांपासून वंचित राहिला आहे. सध्या या दोन्ही ऐतिहासिक वास्तुंना देखभालीअभावी अवकळा आली आहे. मर्दानखान्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने इतर सुविधांबाबत काय अपेक्षा करणार हा प्रश्न आहे. पायाभूत सुविधांपासून हे दोन्ही परिसर दुर्लक्षित राहिल्याने पर्यटकांनी येथे येण्यास पाठ फिरवली आहे.

योगेश गुंड । लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव : निजामशाहीकालीन ऐतिहासिक वास्तुंचे वैभव असणाºया भातोडी परिसरातील कलावंतीणीचा महाल व मांजरसुंबा येथील मर्दानखाना पर्यटनाच्या सुविधांपासून वंचित राहिला आहे. सध्या या दोन्ही ऐतिहासिक वास्तुंना देखभालीअभावी अवकळा आली आहे. मर्दानखान्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने इतर सुविधांबाबत काय अपेक्षा करणार हा प्रश्न आहे. पायाभूत सुविधांपासून हे दोन्ही परिसर दुर्लक्षित राहिल्याने पर्यटकांनी येथे येण्यास पाठ फिरवली आहे.हिरवाईने नटलेला परिसर व जमिनीपासून सुमारे २ हजार ९०० फूट उंचीवर मांजरसुंबा येथील उंच डोंगरावर निजामशहाच्या काळात मर्दानखाना नावाची वास्तू बांधण्यात आली. मांजरसुंबा येथील डोंगरावर बांधलेला हा महाल मांजरसुंबा गड या नावानेच ओळखला जातो. या गडाशेजारी जलविहारासाठी तयार केलेला तलाव, त्यात पाणी भरण्यासाठी हत्ती मोट, स्नानासाठीचा हमामखाना अशी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. नगरपासून २० किलोमीटर अंतरावर डोंगरगण आणि गोरक्षनाथगडाच्या मध्यभागी असलेल्या या डोंगरावर निजामशाहीतील बादशहांच्या विश्रांतीसाठी हा महाल बांधण्यात आला. हाच परिसर येथील निसर्गरम्य परिसरामुळे ‘नगरचे महाबळेश्वर’ म्हणूनही ओळखला जातो. मात्र निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे येणाºया पर्यटकांसाठी काहीच सुविधा उपलब्ध नाहीत. या ऐतिहासिक वास्तुंची मोठी पडझड झालेली असून हा मर्दानखाना नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या महालाची पडझड झाल्याने काही भिंती जमीनदोस्त झाल्या आहेत. उर्वरित भिंतींकडे वेळीच लक्ष न दिल्यास ही वास्तू कधीही नामशेष होऊ शकते. मर्दानखान्याचा बहुतांशी भाग ढासळला आहे. निसर्गरम्य, आरोग्यदायी वातावरण व हवा पालटण्यासाठी विश्रांतीचे ठिकाण म्हणून या वास्तुची उभारणी करण्यात आली. निजामशाही सुरक्षित राहावी, परकीय सत्तांचे आक्रमण होऊ नये म्हणून टेहाळणी करण्यासाठीही या वास्तुंचा उपयोग केला गेला. या महालावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पर्यटक येतील कसे? त्यातच वर येणाºयांना पाणी, वीज, सावली या कुठल्याच सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. याच मांजरसुंबा गडावर पॅराग्लायडिंग व ट्रेकिंगसाठी हौशी पर्यटक येतात. येथेच काही चित्रपटांचे चित्रीकरणही झाले. सुटीच्या दिवशी तर पर्यटकांची मोठी संख्या येथे असते. महालाच्या समोरील बाजूस तीन कारंजी आहेत. डोंगरावर इतक्या उंचीवर तयार केलेला पोहण्याचा तलाव हे येथील वैशिष्ट्य समजले जाते.  भातोडी परिसरातील कलावंतीणीच्या महालाचीही दुरवस्था झाली आहे. निजामशहाच्या काळात बांधलेली ही वास्तू मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. महालाची पडझड झाल्याने त्या वास्तुचा आता फक्त सांगाडा उभा आहे. भातोडी गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. यामध्ये सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे नृसिंह मंदिर, ऐतिहासिक तलाव, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलते शरीफजीराजे भोसले यांची समाधी असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इतिहास प्रसिद्ध भातोडीची लढाई याच परिसरात झाली होती. भातोडी ग्रामस्थांनी नृसिंह मंदिर व शरीफजीराजे भोसले यांची समाधी या दोन्ही स्थळांची देखभाल केली. यामुळे हा वारसा काही प्रमाणात जपला गेला. कलावंतीणीच्या महालामध्ये हत्तींना पाणी पिण्यासाठी मोठी बारव, रंगमहाल, राजमहाल, अतिथी महाल, पागा, छोटे छोटे तलाव होते. मात्र त्याचे आता केवळ अवशेष उरले आहेत.