शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपींची मुक्तता; अहमदनगर जिल्हा न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 19:03 IST

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे या १७ वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दहा आरोपींची बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सुटका केली. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींची यापूर्वीच सुटका झाली आहे.

अहमदनगर : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे या १७ वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दहा आरोपींची बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सुटका केली. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींची यापूर्वीच सुटका झाली आहे.२८ एप्रिल २०१४ रोजी नितीन राजू आगे याची हत्या झाली होती. नितीन हा गावातील शाळेत बारावीला शिकत होता. प्रेमप्रकरणातील नितीन आगे याला आरोपींनी शाळेतून मारहाण करत आरोपींच्या विटभट्टीवर नेऊन तेथे अमानुष मारहाण केली होती. तसेच डोंगरातील झाडाला त्याला गळफास दिला होता, अशी फिर्याद जामखेड पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. गावातील आरोपी सचिन उर्फ आबा हौसराव गोलेकर, शेषराव रावसाहेब येवले, निलेश गोलेकर, विनोद अभिन्यू गटकळ, भूजंग सुर्यभान गोलेकरसह १३ जणांविरुद्ध हत्या करणे, तसेच अ‍ॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते. राज्यभरात खर्डा येथील हत्या प्रकरण गाजले होते. या प्रकरणी दलित संघटनांना आक्रमक झाल्या होत्या. या खटल्यात सव्वीस साक्षीदार होते. शाळेतील वगार्तून नितीन आगेला आरोपी मारहाण करून घेऊन गेले होते. शाळेचे शिपाई व शिक्षक हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्याचे जबाब ही पोलिसांनी नोंदविले होते. परंतु प्रत्यक्षात न्यायालयात या सर्वांनी योग्य साक्ष न दिल्याने सरकारी पक्षाकडून सर्वांना फितूर म्हणून जाहीर केले होते. गावातील इतर साक्षीदार ही फितूर झाले होते. नितीनचे वडिल राजू, आई यांच्याही या खटल्यात साक्ष नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींविरुध्द पुरावे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालय