शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नितीन आगे खून खटला सर्वोच्च न्यायालयात लढवू; सी. एल. थूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 18:21 IST

खर्डा (ता़ जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने याबाबतची वस्तुस्थिती समजून घेऊन हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात लढविण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अहमदनगर : खर्डा (ता़ जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने याबाबतची वस्तुस्थिती समजून घेऊन हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात लढविण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.थूल यांनी मंगळवारी खर्डा येथे मयत नितीन आगे याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन चर्चा केली. थूल म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे या प्रकरणाची वस्तुस्थिती समजवून घ्यावयाची आहे. या खटल्यात जिल्हा न्यायालयात काय त्रुटी राहिल्या, शासनाला अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात कशा पद्धतीने मदत करता येईल याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे. आगे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात येईल. तसेच हा खटला वरिष्ठ न्यायालयात चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमून पुढील कार्यवारी करण्यात येईल. वेळ पडली तर हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयातही लढण्याचीही शासनाची तयारी असल्याचे थूल म्हणाले. दरम्यान खर्डा येथे आगे कुटुंंबीयांना महसूल विभागाकडून घर देण्याचे आश्वासन थूल यांनी दिले. मयत नितीन याचे वडील राजू आगे यांनी आम्हाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. यावेळी खासदार अमर साबळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे उपस्थित होेते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर