निंबळक : वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करून निंबळकचा पाणी प्रश्न कायमचा सोडविणार असून येथे विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे, अशी ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली.
नगर तालुक्यातील निंबळक (ता. नगर) येथे नूतन सरपंच प्रियंका लामखडे व उपसरपंच बाळू कोतकर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच विलासराव लामखडे होते.
निवडणूक संपली आता राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास करावा. चांगली व भरीव कामगिरी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच प्रियंका लामखडे यांनी केले.
वचननाम्यात दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यात येईल, असे अजय लामखडे यांनी सांगितले.
यावेळी बाबासाहेब पगारे, सोमनाथ खांदवे, श्रीकांत आप्पा शिंदे, मालन रोकडे, कोमल शिंदे, पद्मा घोलप, अशोक पवार, तोशीक पटेल, महेश म्हस्के, रावसाहेब कोतकर, भाऊसाहेब गायकवाड, समीर शेख आदी उपस्थित होते.
फोटो : १४ निंबळक
निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे यांचा सत्कार करताना आमदार नीलेश लंके.