शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

निळवंडेची कालवे खोदाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:27 IST

बहुचर्चित निळवंडे धरणाच्या ० ते ३ किलोमीटर दरम्यान प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास जवळपास ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी निर्विघ्न सुरुवात झाली.

अकोले : बहुचर्चित निळवंडे धरणाच्या ० ते ३ किलोमीटर दरम्यान प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास जवळपास ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी निर्विघ्न सुरुवात झाली. लाभक्षेत्रातील आवर्षण प्रवणभागात आनंदोत्सव साजरा झाला.मंगळवारी (दि.११) मंत्रालयात झालेल्या चर्चेनुसार निळवंडेचे कालवे प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बुधवारी पोलीस बंदोबस्तासह कालवे खोदण्यास सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत निळवंडेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या पायथ्या-पासून ‘खोंडवस्ती ते तिटमेवस्तीपर्यंत’ तीन किलोमीटरपर्यंतचे कालवे खोदाईचे काम प्रगतीपथावर होते. शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतातील भूईमूग, वालवडसारखी पिके काढून घेतली. ऊस चाºयासाठी कापून नेला आणि प्रशासनाला सहकार्य केले.शेतकऱ्यांचा जवळपास सर्व विरोध मावळल्याचे चित्र होते. गेली दोन, चार दिवस निळवंडे धरण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. राखीव दलाचे १०० जवान तसेच स्थानिक पोलीस बुधवारपर्यंत होते. मुंबई येथे मंगळवारी अकोलेतील प्रकल्पग्रस्त शेतकºयांसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली.माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, कैलास वाकचौरे, अशोक भांगरे, सुनीता भांगरे, डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यातील बहुतांश मागण्या या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे समजते.बुधवारी पाटबंधारे-जलसंपदाच्या अधिकाºयांनी दोन पोकलेन, चार टिपर, डंपर, जेसीबी आदींसह कालवे खोदाईच्या कामाला गती दिली. कृषी विभागाचे अधिकारी एल. एन. नवले व त्यांच्या सहकाºयांनी शेतात उभ्या असलेल्या पिकांचे पंचनामे केले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,कार्यकारी अभियंता भरत शिंगाडे, उपअभियंता मनोज डोके, रोहित कोरे, तहसीलदार मुकेश कांबळे व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख दिवसभर निळवंडे धरण परिसरात थांबून होते.आमची खोंड कुटुंबाची ३५ खातेदारांची ११ एकर जमीन वीजनिर्मिती गृहासाठी संपादित केली आहे. त्याचा काही मोबदला मिळणे बाकी आहे. सध्या शेतात भूईमूगाचे पीक आहे. काही पीक घाईने काढले. काहीवर पोकलेन फिरला. त्यावर जेसीबीने कालव्याची माती पडली. हे पाहून दु:ख झाले पण दुसरीकडे कुणीतरी या पाण्यातून उभे राहिल, त्यांचा प्रपंच फुलेल याचाही आनंद आहे. -शरद खोंड, प्रकल्पग्रस्त शेतकरीखोंड कुटुंबाची ११ एकर जमीन संपादित केली आहे. नियमानुसार त्यांना मोबदला दिला जाईल. कालवेग्रस्तांचे उर्वरित प्रश्नही मार्गी लावू. कालवेग्रस्त शेतकºयांचा विरोध मावळला आहे. कालवे खोदाईचे काम सुरळीत सुरू आहे. आवश्यक तितकीच जमीन सध्या रेखांकित केली आहे. कालवे तयार होऊन उरणारी जमीन शेतीच्या मूळ मालकाला भाडेतत्त्वावर कसण्यासाठी देण्याचा शासनाचा विचार आहे. -डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय अधिकारी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले