शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

हाॅटेल व्यावसायिकाला गंडा घालणारी नायेरियन टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST

स्टॉन्ली स्मित (रा. मूळ नायजेरिया हल्ली रा. पिंपरी-चिंचवड, पुणे), नीलम गिरिषगोहेल उर्फ निशा शहा, अलेक्स ओड्डू उर्फ मार्क व ...

स्टॉन्ली स्मित (रा. मूळ नायजेरिया हल्ली रा. पिंपरी-चिंचवड, पुणे), नीलम गिरिषगोहेल उर्फ निशा शहा, अलेक्स ओड्डू उर्फ मार्क व अलेन उर्फ मिरॅकल (हल्ली सर्व रा.पिंपरी-चिंचवड, पुणे) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या टोळीने केडगाव येथील ओंकार मधुकर भालेकर यांची फसवणूक केली होती. आरोपींनी प्रथम भालेकर यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर भारतातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडून आमच्या कंपनीला हर्बल ऑईल खरेदी करावयाचे आहे. या व्यवसायात तुम्ही सहभागी झाले तर तुम्हाला लाखो रुपये मिळतील, असे आमिश आरोपींनी भालेकर यांना दाखिवले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगाून भालेकर यांच्याकडून विविध बँक खात्यावर पैसे मागवून घेतले. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर भालेकर यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हेड कॉस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींना पुणे येथून अटक केली. या आरोपींना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींकडून १ मोबाईल, विविध बँकांचे दहा पासबुक, आठ एटीएम कार्ड असा एकूण ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हेड कॉस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलीस नाईक दिगंबर कारखेले, विशाल अमृते, राहुल हुसळे, गणेश पाटील, राहुल गुंडू, अमोल गायकवाड, अभिजित अरकल, अरुण सांगळे, वासुदेव शेलार, सविता खताळ, पूजा भांगरे, प्रितम गायकवाड, उर्मिला चेके, दीपाली घोडके, सीमा भांगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

----------

या टोळीने अनेकांना घातला गंडा

पुणे येथील नायजेरियन टोळीने पैशांचे आमिष दाखून अशाच पद्धतीने अनेकांना ऑनलाइन गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. या आरोपींमध्ये एका महिलेचाही समोवश आहे.

फोटो ०१ आरोपी

नगर येथील हाॅटेल व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली.