शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्रांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवू

By admin | Updated: August 8, 2014 00:23 IST

संगमनेर : ग्रामीण भागातील वृत्तपत्रे व संपादकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

संगमनेर : ग्रामीण भागातील वृत्तपत्रे व संपादकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने अमृतवाहिनी शिक्षण संकुलात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय संपादक संमेलनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर अध्यक्ष किसन हासे, प्रा. जवाहर मुथ्था, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, विभागीय माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, काही वर्षांपूर्वी न्यूज चॅनल्स सुरू झाल्याने प्रिंट मीडियावर अरिष्ट येईल, असे वाटत होते. परंतु त्याच्या उलट घडले. प्रिंट मीडियावर समाजाचा विश्वास आहे. ग्रामीण पत्रकारांमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तांबे यांनी पत्रकारिता हे महत्वाचे क्षेत्र असून लोकशाही व राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर असल्याचे सांगितले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे रवींद्र बेडकिहाळ यांनी ग्रामीण पत्रकार व संपादकांच्या समस्या मांडल्या. पत्रकारांना निवृत्ती वेतन लागू करावे, जिल्हा पत्रकार भवनाचा निधी १० ऐवजी ५० लाख करावा, अशा मागण्या मांडल्या. प्रास्ताविक हासे यांनी केले. विमल नलावडे, शशांक मराठे, मुथ्था, बेडकिहाळ, चंद्रशेखर बेहरे, डॉ. संतोष खेडलेकर, वंदना बंदावणे, अशोक वरूडे, अ‍ॅड. नानासाहेब शिंदे यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन नेहा सराफ यांनी करून डॉ. नामदेव गुंजाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)