शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नववर्षाचा शाळांमध्ये श्रीगणेशा

By admin | Updated: June 15, 2016 23:46 IST

शेवगाव : शेवगाव तालुक्यात ठिकठिकाणी प्रभातफेरी, मुलांचे गुलाबपुष्प देवून स्वागत, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण आदी उपक्रमांनी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला.

शेवगाव : शेवगाव तालुक्यात ठिकठिकाणी प्रभातफेरी, मुलांचे गुलाबपुष्प देवून स्वागत, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण आदी उपक्रमांनी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणी वाड्या- वस्त्यांवरील विद्यार्थ्यांची बैलगाडी, ट्रॅक्टर आदी वाहनांतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शाळेत नव्याने दाखल झालेल्या मुलींचे उत्साहात स्वागत करण्यात आले.शेवगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत शाळा प्रवेशोत्सव उपक्रम उत्साहात पार पडला. मंगळवारी शाळापूर्व दिवशी गावागावात लाऊडस्पीकरवरून १५ जूनपासून शाळा सुरू होत असल्याचे सांगून घरभेटी, शैक्षणिक पदयात्रा या माध्यमातून विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. नवीन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे फॉर्म भरून घेण्यात आले. शाळा परिसर स्वच्छ करणे, सडा शिंपून रांगोळी काढणे, पानाफुलांची तोरणे बांधून देशभक्तीपर गीत वाजविण्यात आले. बुधवारी वर्षभर १०० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. तालुक्यात इयत्ता १ ली ते ८ वी मराठी माध्यमाचे १ लाख ६१ हजार १४१, सेमी माध्यमाचे १५ हजार ७७८, उर्दू माध्यमाचे ४ हजार ५८५ विद्यार्थी असून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील अनुसूचित जातीच्या १ हजार ३५५, अनुसूचित जमातीच्या २४६ व ७ हजार ९०१ मुलींना तसेच दारिद्य्ररेषेखालील ९९२ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यासाठी शाळेच्या बँक खात्यावर ४१ लाख ९७ हजार ६०० रुपयांची रक्कम यापूर्वीच जमा करण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी दिली. तालुक्यातील सर्व २३० प्राथमिक शाळेत अद्ययावत पॉलीमर बँचेस बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील वरूर येथील थोरात वस्ती शाळेवर पं. स. सभापती मंगल काटे यांच्या उपस्थितीत तर आव्हाणे बुद्रूक प्रा. शाळेत उपसभापती अंबादास कळमकर, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. बंकट आर्ले, गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे, केंद्रप्रमुख राजेंद्र बागडे, मुख्याध्यापिका संगिता शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला.गुलाबपुष्प देऊन स्वागतअमरापूर : आदर्श विद्या मंदिर विद्यालयात पाचवीत आलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक भाऊसाहेब खेसमाळस यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. पाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी पालक अनिल काथवटे होते. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी हजर होते. जवळेत पुस्तकांचे वाटपजवळे : जवळे, गुणोरे, सांगवी सूर्या (ता.पारनेर) प्राथमिक शाळा तसेच श्री. धर्मनाथ विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जवळे शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तके, मुलींना कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले. धर्मनाथ विद्यालयात राळेगणथेरपाळचे सरपंच कैलास डोमे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप झाले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव सालके, प्राचार्य डी.एस.व्यवहारे, संभाजीराव सोमवंशी, ग्रा.पं.सदस्य कानिफनाथ पठारे, गौतम खुपटे, वसंत तोडमल, पालक, कर्मचारी हजर होते. सुप्यात पाठ्यपुस्तकांचे वाटपसुपा : सुपा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. प्राचार्य ए. आर. भोर, ज्येष्ठ शिक्षक गंगाधर गाडीलकर, चांगदेव आंधळे, नंदा मगर, मयुरी यादव, सुवर्णा गाडेकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शहाजापूरचे सरपंच शिंदे, ग्रा. पं. सदस्य बबन गवळी, शिक्षक, कर्मचारी, पालक, हजर होते.