शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बँकेचे नियम पाळून नूतन पदाधिकाऱ्यांनी कारभार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST

अहमदनगर : जिल्हा बँक ही सर्वसामान्यांची बँक असून आतापर्यंत बँकेचा लौकिक टिकून आहे. त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांनी बँकेचे सर्व नियम ...

अहमदनगर : जिल्हा बँक ही सर्वसामान्यांची बँक असून आतापर्यंत बँकेचा लौकिक टिकून आहे. त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांनी बँकेचे सर्व नियम पाळून, तसेच पारदर्शी कारभार करावा, अशा कानपिचक्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सर्वच संचालक मंडळाला दिल्या.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदय शेळके व उपाध्यक्षपदी काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची निवड झाल्यानंतर थोरात यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा बँकेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आशिया खंडातील ही नावाजलेली सहकारी बँक आहे. कारखाने तसेच शेतकऱ्यांना कर्जरूपी मदत करून जिल्ह्याच्या विकासात बँकेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. आतापर्यंतच्या धुरिणांनी बँक कुटुंबाप्रमाणे सांभाळली. बँकेची सर्व निवडणूकच बिनविरोध करण्याचा आमचा मानस होता. परंतु काही जागांसाठी निवडणूक झाली. आताच्या निवडीत नव्या-जुन्यांचा मेळ घालण्यात आला आहे. उदय शेळके यांना बँकेचा चांगला अनुभव आहे. कानवडे यांनीही संगमनेर कारखान्याचा कारभार सांभाळलेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांची नावे अंतिम झाली, असे थोरात म्हणाले.

नव्या पदाधिकाऱ्यांना बँकेचा कारभार चांगला करण्याची संधी आहे. सर्व संचालकांनी नियमित बैठकांना उपस्थित राहावे. यापुढे बँकेच्या नियमात व शिस्तीने कारभार करावा, बँकेची थकबाकी कमी करण्याचे नियोजन करा, असे आवाहन थोरात यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना केले.

मंत्री शंकराव गडाख यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत आपले पूर्ण सहकार्य बँकेसाठी असेल, असे सांगितले. नूतन अध्यक्ष शेळके व उपाध्यक्ष कानवडे यांनी, सर्वांच्या सहकार्याने बँकेचा कारभार उत्तम करण्याची ग्वाही दिली.

-------

फोटो - ०६ पदाधिकारी सत्कार

जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांचा सत्कार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते बँक सभागृहात करण्यात आला.