शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

महापालिकेत युतीचा नवा अध्याय

By admin | Updated: July 4, 2016 23:51 IST

अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटणाऱ्या शिवसेना-भाजपाचा महापालिकेत नवा राजकीय अध्याय सुरू होत आहे.

अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटणाऱ्या शिवसेना-भाजपाचा महापालिकेत नवा राजकीय अध्याय सुरू होत आहे. नवनिर्वाचित महापौर-उपमहापौर एकत्रितपणे गुरुवारी (दि.७) सकाळी ११ वाजता पदभार स्वीकारणार आहेत. या सोहळ््यासाठी पर्यटनमंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह शिवसेना-भाजपाचे सर्व गट-तटामधील स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत.महापौर-उपमहापौरपदाची २१ जून रोजी निवडणूक झाली. माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा ३० जून रोजी कालावधी संपला. एक जुलैपासून नव्या महापौर-उपमहापौरांचा कालावधी सुरू झाला. नव्या महापौर सुरेखा कदम यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मातोश्रीवर आशीर्वाद घेतला. त्यानंतर लगेच त्या पदभार घेतील, अशी शक्यता होती. मात्र युतीच्या स्थानिक नेत्यांनी समन्वय ठेवत एकाच दिवशी पदभार घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी युतीच्या मंत्र्यांची तारीख निश्चित करून गुरुवारचा मुहूर्त काढण्यात आला आहे. या पदभार सोहळ््यास राज्याचे पर्यटन मंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, खासदार दिलीप गांधी, माजी आमदार अनिल राठोड, अ‍ॅड. अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शीला शिंदे यांच्यासह सेना-भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. महापालिकेत युतीचा धर्म पाळूनच पुढे जायचे आहे, असा संदेश यानिमित्ताने शहरात जाणार आहे. त्यामुळे युतीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्रित बैठक घेवून वरील निर्णय घेतला आहे. वनमहोत्सवाच्यानिमित्ताने राज्यातही शिवसेना-भाजप एक असल्याचा नारा देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये महापालिकेच्या माध्यमातून एकीचा नारा दिला जाणार आहे. अंतर्गत विकास कामे आणि राजकारण यावरच युतीची दिशा ठरणार आहे. (प्रतिनिधी)