अहमदनगर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर यांच्यावतीने ‘शैक्षणिक नेतृत्व व नवे शैक्षणिक धोरण’ या विषयावर आयोजित वेबिनार मालिकेच्या उदघाटन प्रसंगी बुधवारी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. डी. सूर्यवंशी होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. बाळासाहेब मुरादे उपस्थित होते.
डॉ. बेलसरे म्हणाल्या, धोरणात गुणवत्ता प्रत्येक स्तरावर निश्चित करण्यात आली आहे. लवचिकता, संस्कृतीचा विचार व त्रिभाषा सूत्र हे वैशिष्टे राहिले आहे. येत्या काळात शिक्षणात वेगाने बदलत आहेत. धोरणाचा विचार प्रत्येक शिक्षकांपर्यत पोहचण्याची गरज आहे. मातृभाषेतून विचार पोहचविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे . शिक्षकांनी बदलाची भूमिका जाणून घेण्याची गरज आहे. या निमित्ताने नवे धोरण समाजापर्यत पोहचणार आहे. व्यावसायिक शिक्षणाचा विचार करण्यात आला आहे. मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह महत्वाचा आहे. स्वातंत्र नंतरचे तीसरे व २१ व्या शतकातील पहिले धोरण आहे. मातृभाषेतील शिक्षणांचा आग्रह सर्वच धोरणांनी केला. मात्र, वस्तूस्थिती वेगळी आहे. मातृभाषेतून शिकलेली माणसे समाजापुढे आणण्याची गरज आहे. स्वयंअध्ययन कौशल्य महत्वाचे आहे. अभ्यासक्रमाचा बोजा कमी करणे. संबोधावरती व अनुभवाधारित शिक्षण दिले जाणार आहे. भारतीय भाषा व परदेशी भाषा देखील शिकता येतील. असेही त्या म्हणाल्या.
प्रास्तविक प्राचार्य सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले. महादेव वांढरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष वसावे, महादेव हंडाळ, गणेश मोरे, बाबुराव कांबळे यांनी प्रयत्न केले. या वेबिनारमध्ये शिक्षक मोठया संख्येने सहभागी झाले होते.