शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

नेवासा जिल्हा परिषद गट, गणाच्या फेररचनेला वेग

By admin | Updated: September 21, 2016 00:29 IST

नेवासा : नेवासा नगरपंचायतीची अधिसूचना जारी झाल्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट व गणाची फेररचना करण्यात वेग आला आहे

नेवासा : नेवासा नगरपंचायतीची अधिसूचना जारी झाल्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट व गणाची फेररचना करण्यात वेग आला आहे. नेवासा जिल्हा परिषद गट तर भेंडा गटासाठी मुकिंदपूर गणाची निर्मिती प्राथमिक स्वरूपात तयार करण्यात आली आहे. नेवासा तालुक्यात जिल्हा परिषदचे सात गट तर पंचायत समितीचे चौदा गण होते. नेवासा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने नेवासा गट व गण हे बरखास्त होवून त्याऐवजी भानसहिवरा गट व गण तयार झाला असून भेंडा बु।। गटात नव्याने मुकिंदपूर गण निर्माण करण्यात आला आहे.नव्याने प्रस्तावित असलेल्या गट व गणाची फेररचना करताना चांदा गटात चांदा गण-चांदा, लोहारवाडी, राजेगांव, शिंगवेतुकाई, फत्तेपूर, वांजोळी, कौठा व मांडेगव्हाण या गावांचा समावेश असणार आहे.तर देडगाव गण- देडगाव, तेलकुडगांव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरा, देवसडे या भागाचा समावेश असेल. सोनई गटात, सोनईगण सोनई व शिंगणापूर हे दोन गावे समाविष्ट आहेत तर घोडेगाव गण - घोडेगाव, झापवाडी, मोरेचिंचोरे, लोहगांव, पानसवाडी, धनगरवाडी, वंजारवाडी ही गावे आहेत. खरवंडी गटात - खरवंडीगण - खरवंडी, हिंगोणी, कांगोणी, वडाळाबहिरोबा, बऱ्हाणपूर, रास्तापूर, म्हाळस पिंपळगाव तर करजगाव गण - करजगांव, गणेशवाडी, लांडेवाडी, बेल्हेकरवाडी, पानेगांव, तामसवाडी, शिरेगाव, अंमळनेर, खेडले परमानंद, वाटापूर या गावाचा समावेश आहे.भानसहिवरा गट - भानसहिवरा गण - भानसहिवरा, माळी चिचोंरा, उस्थळ दुमाला, नविन चांदगाव, नारायणवाडी, हंडी निमगांव, सुरेशनगर, निपानी निमगांव ही गावे आहेत तर पाचेगाव गण - पाचेगाव, पुनतगाव, नेवासा बु।।, गोमळवाडी, चिचबन, खुपटी, लेकुरवाळी आखाडा, जायगुडे आखाडा, गोणेगांव, निंभारी या गावाचा समावेश असेल. भेंडा बुद्रुक गट - यात भेंडा बुद्रुक गण - भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, सौंदाळा, देवगांव, नजिक चिंचोली, शहापूर, दिघी ही गावे आहेत तर मुकिंदपूर गण - मुकिंदपूर, बाभूळखेडा, नागापूर, मक्तापूर, पिचडगांव, गोंडेगाव म्हसले, खुणेगांव, रांजणगांव, कारेगांव, खडका हे समाविष्ट करण्यात आले आहेत. कुकाणा गट - कुकाणागण कुकाणा, अंतरवाली, वडुले, चिलेखनवाडी, जेऊर, तरवडी, नांदुरशिकारी, सुलतानपूर, सुकळी खुर्द / बुद्रुक तरशिरसगांव गण - शिरसगांव, गोपाळपूर, खामगांव, रामहोड, वाकडी, पिंप्रीशहाली, गेवराई, पाथरवाला, वरखेड या गावांचा समावेश असणार आहे. बेलपिंपळगांव गटात बेलपिंपळगांव गण - बेलपिंपळगांव, घोगरगांव, जैनपुर, बेलपांढरी, सुरेगांव गंगा, गोधेगाव, उस्थळखालसा, भालगांव, मुरमे, बकुपिंपळगांव, बहिरवाडी, तर सलाबतपूर गण - सलाबतपूर, जळके खुर्द, जळके बुद्रुक, गळनिंब, गिडेगाव, टोका, गोगलगांव, मंगळापूर, खेडले काजळी, प्रवरासंगम, माळेवाडी, म्हाळापूर गावाचा समावेश असणार आहे.(तालुका प्रतिनिधी)