शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालय नीटनेटके

By admin | Updated: July 25, 2016 00:07 IST

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी फाईलींवरील धूळ झटकली़ कागदांचे गठ्ठे व्यवस्थित ठेवत कर्मचाऱ्यांनी आपला विभाग नीटनेटका केला़

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी फाईलींवरील धूळ झटकली़ कागदांचे गठ्ठे व्यवस्थित ठेवत कर्मचाऱ्यांनी आपला विभाग नीटनेटका केला़ दरम्यान प्रांगणातील गौण खनिजची पकडलेली वाहनेही सायंकाळी बाहेर काढण्यात आली़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग काहीसे नीटनेटके पाहायला मिळाले़ पण, हा नेटकेपणा किती दिवस टिकेल, हा खरा प्रश्न आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयात १ आॅगस्ट रोजी महसूलदिन साजरा केला जातो़ यंदा प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांतील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, यावर स्पर्धा घेण्यात येणार आहे़ ही स्पर्धा घेण्यामागे कार्यालयाबरोबर कर्मचाऱ्यांच्या कामात नीटनेटकेपणा यावा, हा उद्देश आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई , रोहयो, नगरपालिका, गृह, महसूल, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा स्वागत कक्ष, ग्रामपंचायत, जिल्हा पुरवठा, सामान्य प्रशासन, दुय्यम निबंधक, रेकॉर्ड शाखा, प्रांत अधिकारी कार्यालये आहेत़ याशिवाय प्रमुख अधिकाऱ्यांची दालनेही आहेत़ यापैकी जो विभाग स्वच्छ असेल ,त्या विभागाचे कर्मचारी आणि त्यांचे प्रमुख, यांचा महसूलदिनी पारितोषिक देवून गौरव करण्यात येणार आहे़ महसूल दिनाच्याआधी एक दिवस पुढील आठवड्यात समितीमार्फत अचानक पाहणी केली जाणार आहे़ पाहणीत पितळ उघडे पडायला नको, म्हणून कर्मचारी कामाला लागले आहेत़ गौण खणिज, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत शाखेतील कर्मचाऱ्यांनी अस्ताव्यस्त पडलेल्या फायली काढून त्या व्यवस्थित ठेवल्या आहेत़ स्वच्छतेत महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग मोठा होता़ कार्यालयातील कपाट स्वच्छ करून कागदांचे गठ्ठे व्यवस्थित ठेवण्यात आले़ काही विभागांनी मात्र यात रस दाखविला नाही़ पारितोषिक नको, असे म्हणून स्वच्छता करण्यास टाळाटाळ केली़कार्यालयांच्या दरवाजांवर लटकवलेले फलक जुनाट झाले होते़ ते ही बदलण्यात आले आहेत़ प्रमुख अधिकाऱ्यांची समितीकडून विभागाची पाहणी होणार आहे़ पाहणीच्यावेळी कार्यालय नीटनेटके दिसले पाहिजे़ कामाला लागा, साफसफाई करा, असे फर्मानच काही विभाग प्रमुखांनी काढल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़ कार्यालयातील कुठल्या कर्मचाऱ्यांकडे कोणते काम आहे, याची एक यादीच दर्शनी भागात लावण्याच्या सूचना आहेत़ या सूचनेचे केवळ सामान्य प्रशासन विभागानेच पालन केले, इतरांनी मात्र तसे न करता कर्मचारी आणि त्यांच्या पदाचे बोर्ड भिंतीवर ठोकले आहेत़ तर काही ते टेबलावर ठेवले आहेत़ (प्रतिनिधी)