शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नगर पोलीस मॅरेथॉनमध्ये नेहा खाडे, अक्षय शिंदे, निकेतन पालवे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:08 IST

पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत दोन हजार नगरकर सहभागी झाले होते. स्पर्धेत नेहा खाडे (तीन किलोमीटर), अक्षय शिंदे (पाच किलोमीटर) व निकेतन पालवे (दहा किलोमीटर) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

ठळक मुद्देतीन किलोमीटर धावणे : नेहा खाडे, करिना बेग व ज्योती केदार.पाच किलोमीटर : अक्षय मच्छिंद्र शिंदे, मारुती कराड व शुभम झावरेदहा किलोमीटर : निकेतन पालवे, दिगंबर डमाळे व अक्षय शिंदे. फुटबॉल : शिवाजीयन्स स्पोर्टस क्लब (प्रथम), आंबेडकर क्लब (द्वितीय)व्हॉलिबॉल : राहुरी क्लब (प्रथम), नेवासे क्लब (द्वितीय).

अहमदनगर : पोलीस दल स्थापना दिनानिमित्त रविवारी येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत दोन हजार नगरकर सहभागी झाले होते. स्पर्धेत नेहा खाडे (तीन किलोमीटर), अक्षय शिंदे (पाच किलोमीटर) व निकेतन पालवे (दहा किलोमीटर) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.महिलांसाठी तीन किलोमीटरची पोलीस मुख्यालय ते मनमाड रोड तर पुरूषांसाठी पाच आणि दहा किलोमीटरची मुख्यालय ते कल्याण रोड असे स्पर्धेचे अंतर होते. जिल्हाधिकारी अभय महाजन व जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याहस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपाधीक्षक मनीष कलवानिया, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नगरसेवक सुवेंद्र गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अ‍ॅड़ सुरेश लगड आदी उपस्थित होते़ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, अधिकारी, महिला, ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेत सहभागी झाले होते़ सहभागी स्पर्धकांना क्रॉम्प्टन ग्रिव्हीज कंपनीच्या वतीने टी शर्ट देण्यात आले.पोलीस दल स्थापना दिनानिमित्त २ ते ६ जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, महिला पत्रकारांना ठाणे अंमलदाराच्या कामाचा अनुभव घेता आला.शेवटच्या दिवशी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ विजेत्यांना उपस्थितांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले़ उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आभार मानले.मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले ७९ वयाचे डॉ़ पांडुरंग झगडे यांनी दहा किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. तर सहा वर्षे वयाची काव्या फिरोदिया ही या स्पर्धेत धावली. या दोघांचा पोलीस अधीक्षकांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस