शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

नातेवाईकही वाळीत चार पिढ्यांपासून ३० कुटुंबांच्या वाट्याला उपेक्षा

By admin | Updated: October 10, 2016 01:06 IST

अरुण वाघमोडे , अहमदनगर आंतरजातीय विवाह केल्याने ६० वर्षांपूर्वी श्रीगोंदा फॅक्टरी येथील एका तिरमली कुटुंबासह त्यांच्या नातेवाइकांना याच समाजातील जातपंचायतीने

अरुण वाघमोडे , अहमदनगरआंतरजातीय विवाह केल्याने ६० वर्षांपूर्वी श्रीगोंदा फॅक्टरी येथील एका तिरमली कुटुंबासह त्यांच्या नातेवाइकांना याच समाजातील जातपंचायतीने वाळीत टाकले़ तीन पिढ्या लोटल्या. या कुुटुंबांचा मोठा विस्तार विस्तार झाला़ जातपंचायतीने ठेवलेला ठपका मात्र आजही कायम आहे़ ३० कुटुंबांतील सुशिक्षित झालेली चौथी पिढी आता जातीत सामील करून घेण्यासाठी संघर्ष करत आहे़ जातीत घ्यावे, यासाठी २० लाख रुपये देण्याचे मान्य केले, तरी पंचांनी जातीत न घेतल्याने आता त्यांनी कायदेशीर मार्गाने लढा सुरू केला आहे़ श्रीगोंदा फॅक्टरीजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या जोशी वस्तीत ४०० भटके विमुक्त कुटुंब गेली अनेक वर्षे वास्तव्यास आहेत़ तिरमली कुटुंबातील ३० ते ४० कुटुंबही येथे राहतात़ ६० वर्षांपर्वी या कुटुंबात दुसऱ्या जातीतील महिला आल्याने त्यांना बहिष्कृत केले़ बहिष्कृत केलेल्या कुटुंबांतील मुला-मुलींचे कुठेच लग्न जमेनात़ पर्याने या कुुटुंबांना पुन्हा आंतरजातीय विवाह करण्याची वेळ आली़ तेव्हा पुन्हा जातपंचायत बसली आणि या कुटुंबांवर ठपका ठेवण्यात आला़ आज या २५ ते ३० कुटुंबांत १३० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. अनेक मुली दहावी, बारावी, तर दहा ते बारा मुले पदवीचे शिक्षण घेत आहेत़ अनेकांची पक्की घरेही आहेत़ मात्र केवळ जातपंचायतीने बहिष्कृत केल्याने या कुटुंबांतील मुले आणि मुलींची कुठेच सोयरीक जमेना़ यांच्याशी नाते जोडले, तर आपल्यालाही पंच बहिष्कृत करतील, अशी या समाजातील लोकांना भीती आहे़ तर ज्यांनी या बहिष्कृत कुटुंबांशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना धमकी देऊन नाते तोडण्यास भाग पाडले़ सार्वजनिक कार्यक्रमात या कुटुंबांना सामील करून घेतले जात नाही़ अंत्यविधीसाठीही त्यांच्याकडे कुणाला येऊ दिले जात नाही़ उपेक्षित जीवन जगण्याची वेळ या कुटुंबांवर आली आहे़ जातीपंचायतीसमोर व्यथा मांडूनही त्यांची दखल घेतली नाही़ ४श्रीगोंदा फॅक्टरी येथील बहिष्कृत केलेल्या कुटुंबांतील मंगल गायकवाड, सुरेश पालवे, राहुल गायकवाड, चंदर पालवे, अण्णा गायकवाड, गंगाराम गायकवाड आदी सुशिक्षित तरुणांनी या जातपंचायतीविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे निर्णय घेतला आहे़ या लढ्यात लोकाधिकारी आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड़ अरुण जाधव यांनी पुढाकार घेतला आहे़ आठ दिवसांपूर्वी जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ श्रीगोंदा फॅक्टरी येथून दुसरीकडे वास्तव्यास गेलेल्या या कुटुंबातील नातेवाइकांनाही जातपंचायतीने बहिष्कृत केले आहे़ यामध्ये कोपरगाव ३, आष्टी १, संगमनेर २, पाटसरा ४, तर शेवगाव येथील २ कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले आहे़