शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी क्रांतिकारकांच्या इतिहासावर संशोधनाची गरज : भाऊसाहेब चासकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:56 IST

आदिवासी क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या योगदानाकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष झाले असल्याची खंत व्यक्त केली

राजूर : आदिवासी क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या योगदानाकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष झाले असल्याची खंत व्यक्त केली. या क्रांतिकारकांचा इतिहासाचे आज संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी केले.जागतिक आदिवासी दिनानिमित्त राजूर प्रकल्प कार्यालयाच्या मवेशी येथील संकुलात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून चासकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुजाता वायळ, सदानंद राणे, वनक्षेत्रपाल डी.डी.पडवळे, डॉ.एम.के.भांडकोळी, बांधकाम विभागाच्या सहायक अभियंत्या रिया वाकचौरे, लोकपंचायतचे हनुमंत उबाळे, सरपंच कमल बांबळे, सहायक प्रकल्प अधिकारी साबळे, राजू पवार, राजेंद्र मैड उपस्थित होते.आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करत मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. चासकर म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती आणि इतिहास समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगत पाठ्यपुस्तकांमधला आशय आणि भाषा यांचा आदिवासी मुलांच्या जीवनाशी मेळ खात नसल्याने विषयांमधल्या संकल्पना समजायला त्यांना जड जात असल्याचे मत त्यांनी नोंदवले.आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक वायळ, डॉ भांडकोळी यांनी आपले अनुभव यावेळी विषद केले. सहायक अभियंत्या वाकचौरे, प्रकल्प अधिकारी ठुबे यांनी मार्गदर्शन केले. शुक्रवारी सकाळी मवेशी संकुलात प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आदिवासी समाजाच्या चालीरिती व परंपरा यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्या तीन क्रमांकांच्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर संकुलातील चारही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अदाकारीने उपस्थितांना खिळवून ठेवले. या विद्यार्थ्यांना वनक्षेत्रपाल पडवळे, डॉ भांडकोळी यांनीही रोख पारितोषिक देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. आभार प्राचार्य डॉ. देविदास राजगिरे यांनी मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले