शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गावागावात राहिबाई निर्माण होण्याची गरज : चंद्रकांत पाटिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 18:29 IST

महिलांचे आरोग्य, शिक्षण व महिला स्वयंपूर्ण होण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगतानाच पारंपरिक बियाणे संवधंर्नातून देशभर ओळख निर्माण केलेल्या राहिबाई पोपेरे यांचे कार्य सर्वासाठी पथदर्शी आहे.

ठळक मुद्देबीजमाता राहिबाईं पोपेरे यांच्या बियाणे बँकेचे उद्घाटन

शिर्डी : महिलांचे आरोग्य, शिक्षण व महिला स्वयंपूर्ण होण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगतानाच पारंपरिक बियाणे संवधंर्नातून देशभर ओळख निर्माण केलेल्या राहिबाई पोपेरे यांचे कार्य सर्वासाठी पथदर्शी आहे. गावागावात राहिबाई निर्माण होण्याची गरज असल्याचे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटिल यांनी व्यक्त केलेकोंभाळणे (ता. अकोले) येथे बीजमाता राहिबाई पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेच्या व घराच्या उद्घाटनावेळी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाते. सरपंच शांताबाई पोपेरे, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, अशोक भांगरे, संदिप भुजबळ, शिवाजी धुमाळ, सुनिता भांगरे, बाजीराव दराडे उपस्थित होते.पाटील म्हणाले, दुर्गम भागात पारंपारिक बियांणे संवर्धनाच्या कामामुळे राहिबाईंचे नाव जगभर झाले. स्वत:सोबतच परिसरातील महिलांना बरोबर घेऊन राहिबाईंनी केलेले पारंपारिक बियांणे संवर्धनाचे काम पथदर्शी आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात राहिबाईंनी बोलतांना बीज बँक व घराची अडचण मांडली. राहिबाईंनी मांडलेली अडचण दूर करण्यासाठी त्यांना पर्यांवरणपुरक बियाणे बँक उभी करुन दिली आहे. या बियाणे बँकेच्या माध्यमातून पारंपारिक बियाणांच्या संवर्धनासोबतच पारंपरिक बियाणांचा प्रचार व प्रसार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोंभाळणे परिसरात ७२ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांची अडचण दूर होणार आहे. मोबाईल टॉवरचीही उभारणी करण्यात येणार असून त्यामुळे भ्रमणध्वनी सुविधा लवकरच मिळणार आहे. यासोबतच गावातील आवश्यक सोईसुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, दुर्गम भागात राहिबाईंनी बियाणे संवर्धनाच्या कामातून संपुर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. केंद्रशासनाकडूनही राहिबाईंच्या कार्यांचा गौरव होणार आहे. राहिबाईंनी दुर्गम भागात सेवाभावी वृत्तीने केलेले काम नक्कीच दिशादर्शक ठरेल.बियाणे जपण्याचे काम वाढविणारबीजमाता राहिबाईं पोपेरे म्हणाल्या, वीस वर्षांपासून पारंपारिक बियाणे संवर्धनाचे काम करत आहे. आज तीन हजार महिलांसोबत काम करते. पारंपरिक बियाणे संवर्धनासाठी आवश्यक बियाणे बँक व घरांची अडचण पुण्यातील एका कार्यक्रमात मांडली. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या मागणीची तातडीने दखल घेत बियाणे बँक व घरांची उभारणी करुन दिली. याचा मला मोठा आनंद झाला आहे. या बियाणे बँकेच्या मदतीने न पारंपरिक बियाणे जपण्याचे काम वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी