शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

राष्ट्रवादीच्या जेवणावळीवर पथकाचा छापा : निवडणूक सनियंत्रण पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 11:34 IST

सारसनगर येथील सर्वमंगल मंगल कार्यालयात सुरू असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जेवणावळीवर निवडणूक सनियंत्रण पथकाने छापा टाकला.

अहमदनगर : सारसनगर येथील सर्वमंगल मंगल कार्यालयात सुरू असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जेवणावळीवर निवडणूक सनियंत्रण पथकाने छापा टाकला. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात संबंधित उमेदवार व पक्षाला नोटीस बजावून खुलासा मागण्यात येणार आहे. अन्यथा हा खर्च निवडणूक खर्चाच्या हिशोबात समाविष्ट करण्यात येईल, अशी माहिती पथकप्रमुखांनी दिली.महापालिका निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे, उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवणे यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीअंतर्गत असलेले पथक शहरात फिरून निवडणूक काळात आर्थिक गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे.बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सारसनगर येथील सर्वमंगल मंगल कार्यालयात राष्ट्रवादीतर्फे मतदारांसाठी जेवणावळ सुरू असल्याची माहिती या पथकाला समजली. त्यानुसार पथकातील अधिकारी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी प्राजित नायर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे सुमारे २५० ते ३०० लोक जेवण करताना आढळले. पथकाने त्वरित ही जेवणावळ थांबवून आयोजकांसमवेत पंचनामा केला. एकाच वेळी एवढ्या लोकांना जेवण कशासाठी देण्यात आले? अशी नोटीस पक्षासह संबंधित उमेदवारांना बजावण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.दरम्यान, ही कारवाई सारसनगर परिसरात चर्चेचा विषय ठरली. अशा कारवायांमुळे शहरातील अनेक हॉटेलांमध्ये सुरू असलेली अवैध मद्यविक्री, तसेच कार्यकर्त्यांच्या जेवणावळी पथकाच्या रडारवर आल्या आहेत. ही कारवाई राष्टÑवादीसाठी धक्का मानली जाते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAhmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूक