शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 14:02 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून, विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली़ त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात असल्याने जिल्ह्यातील राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून, विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली़ त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात असल्याने जिल्ह्यातील राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील पक्ष कार्यालयात नगर जिल्ह्यातील शिर्डी व अहमदनगर लोकसभेसाठीची जिल्ह्यातील नेत्यांची बैठक पार पडली़ या बैठकीत दक्षिण नगर जिल्ह्यातील नेत्यांनी लोकसभेची उमेदवारी आमदार अरुण जगताप यांना देण्याची मागणी केली़ आमदार राहुल जगताप, माजी आमदार दादा कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, बाळासाहेब जगताप, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, शहराध्यक्ष माणिक विधाते, राजेंद्र कोठारी, सुजित झावरे आदी बैठकीला उपस्थित होते़ पक्षनिरीक्षक दिलीप वळसे यांनी आठ दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार अरुण जगताप यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली होती़ याबाबत आमदार जगताप यांच्या संपर्क कार्यालयात दोन तास चर्चा झाली़ त्यावर मुंबई येथे झालेल्या बैठकीतही चर्चा झाली असून, जिल्ह्यातील नेत्यांनी आमदार अरुण जगताप यांना नगर दखिण लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली़ याचबरोबर प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवाराची मागणी केली आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangram Jagtapआ. संग्राम जगताप