शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निलेश लंके यांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 19:31 IST

शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके आपल्या मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.

पारनेर : शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके आपल्या मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. पुढील महिन्यात पारनेर येथील मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याची माहिती आहे.पारनेरचे शिवसेनेचे आमदार विजय औटी व शिवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्यात मागील वर्षी मतभेद झाले होते. तसेच २७ फेब्रुवारीस आ.औटी यांच्या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर लंके समर्थकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर लंके यांची तालुकाप्रमुख पदावरून व शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. या प्रकारानंतर लंके यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार औटी यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.शरद पवार, अजित पवारांसोबत बैठकपारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे मधुकर उचाळे, अशोक सावंत, पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार यांनी निलेश लंके यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्याबरोबर बैठक घडवून आणली. यावेळी लोकसभेच्या आधी सक्रिय होण्याचा संदेश निलेश लंके यांना देण्यात आला. त्यानुसार मागील आठवड्यात परत राष्ट्रवादीचे नेते व लंके यांच्यात बैठक झाली. त्यात पुढील महिन्यात पारनेर येथे प्रवेश मेळाव्याचे नियोजन करण्यात आले.मधुकर उचाळे यांचे डावपेचलंके यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी मधुकर उचाळे यांनी पैलवान पध्दतीने डाव टाकल्यानंतर लंके पक्ष प्रवेशासाठी तयार झाले. यामुळे मात्र राष्ट्रवादीचे सुजित झावरे, अभिषेक कळमकर, उदय शेळके पेचात सापडले आहेत.निलेश लंके यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून निर्णय होईल. लंके यांना विधानसभेत पाठविण्यासाठी एखाद्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा लागेल. -दादा शिंदे, अध्यक्ष, निलेश लंके प्रतिष्ठान.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर